पावसाळी वाहिन्यांचा राडारोडा अद्याप रस्त्यावर | पुढारी

पावसाळी वाहिन्यांचा राडारोडा अद्याप रस्त्यावर

महर्षीनगर, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या ड्रेनेज विभागाकडून पावसाळी वाहिन्या स्वच्छतेची कामे सुरू आहेत. पावसाळी वाहिन्यामधील काढलेला कचरा अद्यापही रस्त्यावर पडलेला आहे. अनेक ठिकाणी हा राडारोडा रस्त्याच्या मध्यभागी असल्याने वाहतुकीस अडथळा ठरत आहे. तर अनेक ठिकाणी हा राडारोडा चेंबरलगत असल्याने पुन्हा वाहिन्यांमध्ये जात आहे.

पावसाचे पाणी आले तर हा राडारोडा पुन्हा चेंबरमध्ये जाण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवली आहे. चेंबर साफ करून आठ दिवस झालेत, राडारोडा रस्त्यात आहे. याचा त्रास आम्हाला होतो. अचानक पाऊस आला तर राडारोडा वाहून पुन्हा चेंबरमध्ये जाईल. मनपाने राडारोडा काढताना तत्काळ उचलणे भाग होते, पण ते केले जात नाही. असे स्थानिक रहिवासी पुष्पलता हुले यांनी सागितले.

महर्षीनगर, मुकुंदनगर चाळी भागात पावसाळी वाहिन्या स्वच्छतेतील राडारोडा रस्त्यावरच पडून आहे. ठेकेदाराकडून वाहिन्यांची स्वच्छता केली जाते, त्यानंतर राडारोडा उचलला जातो. ओला राडारोडा असल्याने उचलला जात नाही. अशा प्रकारे राडारोडा असेल तर तो तत्काळ उचलला जाईल, असे अभियंता सोनवणे यांनी सागितले.

Back to top button