बिरदवडी : पोषण आहाराची १५ पोती अवैध विक्रीसाठी नेताना पकडली | पुढारी

बिरदवडी : पोषण आहाराची १५ पोती अवैध विक्रीसाठी नेताना पकडली

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा: बिरदवडी (ता. खेड) येथील बाबुराव पवार विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार म्हणून शासनाकडून आलेली तुरडाळ व तांदुळ या साहित्याची सुमारे ३० हजार रुपयांची १५ पोती विक्रीसाठी नेली जात असताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. विद्यालय संस्थेच्या अध्यक्षा देवयानी पवार, प्रभारी मुख्याध्यापक व्ही. एम. चव्हाण, ईशान पवार, अनिल चौगुले यांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात शनिवारी 11 जूनला पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांच्या विरोधात राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील शिक्षिका पुष्पा म्हसे (रा. नामदेव नगर, आंबेठाण, चाकण) यांनी तक्रार नोंदवली आहे. शुक्रवारी रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत ३० हजार रुपयांचा तांदुळ व तुरडाळ व पोती वाहून नेणारा  पिकअप (एमएच १२ सीएच ५१८२) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बाटली आडवीच ! न्यायालयानंतर राज्य सरकारकडूनही निघोजची दारूबंदी कायम

Back to top button