बदलीबाबत शिक्षकांवर अन्याय होणार नाही; हसन मुश्रीफ यांचे आश्वासन | पुढारी

बदलीबाबत शिक्षकांवर अन्याय होणार नाही; हसन मुश्रीफ यांचे आश्वासन

पुणे : पुढारी वृत्तसेवा

‘ग्रामविकास विभागामार्फत होणार्‍या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची बदलीप्रक्रिया अत्यंत सोपी, पारदर्शक करण्यासाठी संगणकीय ऑनलाइन प्रक्रियेचा अवलंब केला जाणार आहे. या प्रणालीमुळे जिल्हा परिषदेच्या कोणत्याही प्राथमिक शिक्षकांवर अन्याय होणार नाही,’ असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईत दिले.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत, तसेच आंतरजिल्हा बदल्यांसाठी ग्रामविकास विभागाने ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीचे अनावरण मुश्रीफ यांच्या हस्ते मंत्रालयात झाले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, उपसचिव का. गो. वळवी,

नाशिक : शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

पुणे जिल्हा परिषद सीईओ तथा समिती अध्यक्ष आयुष प्रसाद, सातारा जिल्हा परिषद सीईओ विनय गौडा, पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ संजय कोलते, वर्धा जिल्हा परिदेचे सीईओ सचिन ओंबासे यांच्यासह आज्ञावली विकसित करणारे विन्सीस आयटी सर्व्हिसेस आणि साय-फ्युचर इंडिया प्रा. लि.चे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले, शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली होती. या अभ्यासगटाने राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी विभागवार भेटी व चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रत्यक्ष बदल्या करताना त्यांना बदल्यांसंदर्भात येणार्‍या अनुभवांचा अभ्यास करून अहवाल शासनाला सादर केला.

अर्ज करावा लागणार

बदलीस पात्र शिक्षकांना जिल्ह्यातील 30 शाळांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे पक्षाघाताने आजारी शिक्षक, दिव्यांग शिक्षक, शस्त्रक्रिया झालेले शिक्षक, विधवा शिक्षिका, कुमारिका शिक्षिका, परित्यक्ता-घटस्फोटित महिला शिक्षक तसेच व्याधिग्रस्त शिक्षकांबरोबरच पती-पत्नी एकत्रीकरण आदी या विशेष संवर्ग शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदली नको असल्यास अर्ज करावा लागणार आहे.

Back to top button