महाविद्यालयाच्या संचालकास 75 कोटीचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक | पुढारी

महाविद्यालयाच्या संचालकास 75 कोटीचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुण्यातील एका नामांकित शैक्षणिक संस्थंच्या संचालकास शैक्षणिक कामकाजाकरिता 75 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो अशी बतावणी करून प्रोसेसिंग फी स्वरूपात 12 लाख घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारताने श्रीलंकेला केलेल्या मदतीचे ड्रॅगनकडून कौतुक

याप्रकरणी राजेश शेळके व मानसी शेळके (रा.कल्याण,मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जाधवर कॉलेजचे प्रमुख डॉ. सुधाकर उध्दवराव जाधवर (वय-60,रा. नर्‍हे, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. सदर प्रकार जून 2019 ते आतापर्यंत घडला आहे. राजेश शेळके व मानसी शेळके हे प्रोग्रेस एंटरप्रायझेसचे मालक आहे.

कॅन्सरवर सापडले रामबाण औषध?

त्यांनी डॉ.सुधाकर जाधवर यांचे प्रेरणा प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या सुधारणेसाठी 50 कोटी रुपये व उध्दवराव जाधवर फांऊडेशनला 25 कोटी रुपये असे एकूण 75 कोटी रुपये कर्ज मिळवून देतो असे सांगितले. कर्ज मिळवून देत असल्याचे सांगत त्यांनी जाधवर यांचा विश्वास संपादन करत त्यांच्याकडून लबाडीच्या इराद्याने कर्जाच्या प्रोसेसिंग फी च्या नावाखाली आरटीजीएसने प्रोग्रेस एंटरप्रायझेसच्या व मानसी शेळके यांच्या बँक खात्यावर 12 लाख रुपये घेतले गेले. मात्र, जाधवर यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज न देता तसेच कर्ज मंजूर झाल्याची कागदपत्रे पाठवून त्यांची फसवणुक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Back to top button