दीड वर्षात तब्बल 20,874 घरांचे वाटप; म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांची माहिती | पुढारी

दीड वर्षात तब्बल 20,874 घरांचे वाटप; म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांची माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून दीड वर्षात तब्बल 20 हजार 874 घरांचे आणि 67 भूखंडांचे वाटप करण्यात आल्याची माहिती मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून सप्टेंबर 2020 ते मे 2022 या कालावधीत तब्बल 20 हजार 874 घरांचे वाटप करण्यात आले आहे.

22 जानेवारी 2021 रोजी 5,647 सदनिकांचे वाटप करण्यात आले असून, या वेळी 67 भूखंडदेखील वाटप करण्यात आले आहेत.
02 जुलै 2021 रोजी 2,908 सदनिकांचे वाटप करण्यात आले, तर 28 ऑगस्ट 2021 रोजी 4,222 सदनिकांचे वाटप करण्यात आले आहे. याचबरोबर 27 एप्रिल 2022 रोजी 2,700 सदनिकांचे वाटप करण्यात आलेले आहे.

बारावीचा निकाल याच आठवड्यात जाहीर

जून 2022 रोजी 4,965 सदनिका वाटप करण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत एकूण 20 हजार 8,974 सदनिका 67 भूखंडांचे वाटप करण्यात आल्याचे माने यांनी सांगितले. मागील दोन वर्षांपासून कोरोना संकट असतानादेखील म्हाडाकडून घरवाटपाचा उपक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरू ठेवण्यात आला. नागरिकांनीदेखील याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे.

म्हाडाकडून स्वतंत्र शिबिर राबविण्यात येत आहे. अनेक बिल्डर म्हाडाला प्लॅट देण्यास नकार देत होते. मात्र, त्यांना वारंवार नोटिसा काढण्यात आल्या. कारवाईचा बडगा दाखविण्यात आला. त्यानंतर तातडीने बिल्डरांनीदेखील म्हाडा घर वर्ग करण्यास सुरुवात केली. यामुळे सर्वसामान्य माणसांचे घर मिळण्याचे स्वप्न साकार होण्यास मदत झाली.

सर्वसामान्यांना घर मिळावे

सर्वसामान्य नागरिकांना घराचे स्वप्न साकार करणे अतिशय कठीण असते. त्यांना ते घर मिळावे, याकरिता म्हाडाचे मोठे योगदान आहे. मागील दीड वर्षापासून घर वाटप दर तीन महिन्यांनी करण्यात येत आहे. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा 

आडनावांवरून ओबीसींचा शोध; पुणे, पिंपरीत विधानसभानिहाय मतदार याद्यांची छाननी

‘पुढारी’ एज्यु दिशा प्रदर्शनाची उत्कंठा शिगेला

बोरिस जॉन्सन यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव

Back to top button