पुणे : दहशत पसरविणार्‍या खंडणीखोराला अटक | पुढारी

पुणे : दहशत पसरविणार्‍या खंडणीखोराला अटक

बारामती : पुढारी वृत्तसेवा

बारामती शहरात दहशत माजवून खंडणी गोळा करणार्‍या सराइताला शहर पोलिसांनी अटक केली आहे. आदेश संजय कुचेकर (रा. साठेनगर, कसबा, बारामती) असे या सराइताचे नाव आहे.

महाड : पतीच्या त्रासाला कंटाळून तिने घेतला ६ मुलांचा जीव; पतीविरूद्ध गुन्हा दाखल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कसबा येथील नितीन वाईन्स शॉपमध्ये मॅनेजर व कामगारांना आरोपीने तलवारीचा धाक दाखवून त्यांना काठी व हाताने मारहाण केली, तसेच काउंटर फोडून दुकानातून रोख रक्कम व दारू जबरीने चोरली.

मी येथील दादा आहे, मला दारूचे बिल मागायचे नाही. मागितले तर रोडवर समाधी बांधीन, अशी धमकी देत दुकानातील ग्राहकांना आरोपीने मारहाण करून हुसकावून लावल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी कसबा येथील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आदेश संजय कुचेकर याला बारामती शहर पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले.

काश्मिरी पंडितांकडून आजही स्थलांतराचा विचार होतोय : संजय राऊत

ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश पाटील, युवराज घोडके पोलिस अंमलदार रामचंद्र शिंदे, दशरथ इंगोले, अजित राऊत यांनी ही कारवाई केली. आरोपीला अटक केली असून त्याने याच दोन महिन्यांपूर्वी कसबा भागातील एका युवकावर जीवघेणा हल्ला केलेला होता. हा आरोपी त्याचा जोडीदार गणेश गायकवाड व व अनिल खिलारे यांच्या मदतीने त्या भागात दहशत निर्माण करत आहे. कुचेकर पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर त्याचे उर्वरीत साथीदार परागंदा झाले आहेत. या आरोपीला न्यायालयापुढे हजर केले असता त्याला दोन दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे. आरोपीवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई होणार असल्याचे पोलिस निरीक्षक महाडिक यांनी सांगितले.

Back to top button