पुणे : सांगलीचा तरुण हनीट्रॅपमध्ये अडकला आणि…अर्ध्या लाखाला बुडाला! | पुढारी

पुणे : सांगलीचा तरुण हनीट्रॅपमध्ये अडकला आणि...अर्ध्या लाखाला बुडाला!

पुणे : पुढारी वृत्तसेवा

तो मुळचा सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचा… एमबीएच्या दुसर्‍या वर्षाला शहरातील एका नामांकित कॉलेजमध्ये शिकतो.. फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणासोबत त्याची ओळख झाली. एकेदिवशी त्याला फेसबुकवरील त्या मित्राने शरिर संबंध ठेवण्याची ऑफर दिली. सुरूवातीला त्याने नाही म्हटले. मात्र काही वेळानंतर त्याची ऑफर स्वीकारली. ठरल्याप्रमाणे तो गुरूवार पेठेतील एका घरात गेला. त्यावेळी चौघांनी तरुणाचा व्हिडीओ काढत असल्याचा बहाणा करून, तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून जबरदस्तीने 55 हजाराची खंडणी उकळली. एवढेच नाही तर रात्रभर त्याला खोलीत डांबून ठेवले.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीचे समन्स

याप्रकरणी खडक पोलिसांनी दोघा सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक केली आहे. साहिल कुरेशी,अनिकेत जाधव, सुदामा चौधरी, रोहित चव्हाण अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील कुरेशी व जाधव हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत वडगाव शेरी (मुळ. इस्लामपुर, सांगली) येथील एका 24 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे.

गडचिरोली : ७५ वर्षीय वृद्धेचा उष्माघाताने मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण शहरातील एका नामांकित कॉलेजमध्ये एमबीएच्या दुसर्‍या वर्षाला शिकतो. तसेच तो एका बँकेचे कामही पाहतो. त्याला त्याचे प्रतिमहिना साठ हजार रुपये मानधन मिळते. सहा महिन्यापुर्वी त्याचा कुरेशी याच्यासोबत फेसबुकच्या माध्यमातून परिचय झाला होता. दोघांची मैत्री झाल्याने ते फोनवर एकमेकांच्या संपर्कात होते.

PMJJBY-PMSBY : केंद्राने पीएम जीवन ज्योती आणि सुरक्षा विमा योजनेचा प्रीमियम वाढवला, जाणून घ्या नवे दर

शरीर संबंधाची ऑफर अन्….

28 मे रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास कुरेशी याने तरुणाला शरिरसंबंध ठेवायचे आहेत का, असे विचारले. सुरुवातीला तरुणाने त्याला नकार दिला. मात्र काही वेळाने होकार दिला. ठरल्याप्रमाने कुरेशी याने तरुणाला गौरी आळी गुरूवार पेठेतील एका घरात बोलावले. त्यानुसार तरुण 29 मे रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास सांगितलेल्या ठिकाणी गेला. कुरेशी हा अगोदरच तेथे हजर होता. तरुण तेथे गेला असता, काही वेळातच इतर तीन आरोपी तेथे आले. गाडीतील पेट्रोल संपल्याचे सांगून ते तिघे तेथे आले होते.

WhatsApp चे नवीन फीचर येतेय, sent झालेला मेसेज एडिट करता येणार!

काहीवेळ गप्पा झाल्यानंतर चौघा आरोपीनी दमदाटी करून तरुणाकडे पैशाची मागणी केली. मात्र तरुणाने पैसे नसल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपींनी तरुणाचा व्हिडीओ काढत असल्याचे भासवून, तो गे असल्याचे दाखवून संबंधीत व्हिडीओ व्हायरल करण्याची व पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, अनिकेत याने तरुणाच्या हातीतील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून त्याचा पासवर्ड विचारला. तरुणाने भितीपोटी पासवर्ड आरोपींना सांगितला.

कर्ज बुडवल्याप्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल

पैसे घेतले ऑनलाईन ट्रान्सफर करून

त्यानंतर आरोपींनी तरुणच्या खात्यातून ऑनलाईन 55 हजार 689 रुपये दुसर्‍याच्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले. आरोपींनी तरुणाला त्या खोलीत सकाळी सात वाजेपर्यंत डांबून ठेवले होते. सकाळी त्याला सोडून देण्यात आले होते. घडलेल्या प्रकारामुळे तरुण घाबरला होता. त्यानंतर त्याने खडक पोलिस ठाण्यात धाव घेत त्याच्यासोबत झालेल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहूल खंडाळे करीत आहेत.

Back to top button