सहकार प्राधिकरण होणार डिजिटाईज | पुढारी

सहकार प्राधिकरण होणार डिजिटाईज

पुणे : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांतील विविध कामांसाठी आता माहिती तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली आहे, असे माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले. मतदार याद्यांचे अधीक्षण, निर्देशन व नियंत्रण करणे व सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी प्राधिकरणाचे https://scea.maharashtra.gov.in/ असे संकेतस्थळ कार्यान्वित झाले आहे.न संकेतस्थळाला नागरिकांसह सहकारी संस्थांचा चांगल प्रतिसाद आहे.

रिंकू सिंग नोबॉलवर बाद झाला होता?

ते म्हणाले, राज्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्था (250 सभासद व त्यापेक्षा कमी सभासद असणार्‍या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून), तसेच निवडणुकीस पात्र असलेल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक कामकाजाचे सनियंत्रण या प्राधिकरणामार्फत करण्यात येते. कामकाजात या पुढील काळात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर सहकारी संस्था आणि कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या सभासद, निवडणूक कामकाजाच्या विविध टप्प्यांची माहिती दर्शकांना सुलभरीतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे.

पहिली ते चौथी प्रत्येकी एकच पुस्तक

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची संरचना, सहकारी संस्था व कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची कार्यपद्धती, त्यासंबंधित अद्ययावत कायदे व नियम, सहकारी निवडणूक अधिकार्‍यांची हस्त पुस्तिका, राज्यातील जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तसेच तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांची संपर्क यादीसह अन्य उपयुक्त माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. लवकरच त्यामधील सुविधा अधिक विस्तारित करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिव यशवंत गिरी यांनी दिली आहे.

11 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस कोसळणार

संकेतस्थळास अन्य विभागही लिंक…

सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या https://scea.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर सरकारी निवडणूक प्राधिकरणाशी निगडित असलेले सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, साखर आयुक्त, पणन संचालक, दुग्धव्यवसाय विकास आयुक्त, वस्त्रोद्योग आयुक्त, उद्यम विकास आयुक्त, मत्स्यव्यवसाय आयुक्त, गृहनिर्माण विभाग या संकेतस्थळांची माहिती (लिंक) देण्यात आली आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button