‘महाराष्ट्र संगीत पर्यटनाला चालना द्या’ | पुढारी

‘महाराष्ट्र संगीत पर्यटनाला चालना द्या’

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शास्त्रीय संगीताशी निगडित अनेक गायक-वादकांची घरे, संस्था अन् इतर ठिकाणेही महाराष्ट्रात आहेत. ती पर्यटकांना पाहता यावी अन् त्यांचा संर्वधन-विकास व्हावा, यासाठी महाराष्ट्र संगीत पर्यटन प्रकल्प राबवावा अशी सूचना ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित विकास कशाळकर यांनी राज्य सरकारला पत्राद्वारे केली आहे.

राजीव कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त, १५ मे रोजी पदभार स्वीकारणार

शास्त्रीय संगीताशी संबंधित जी-जी ठिकाणे राज्यात आहेत, त्याचे संवर्धन करून ती संगीत पर्यटनासाठी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी सरकारला सुचविले असून, या प्रकल्पाबाबतचे पत्र त्यांनी नुकतेच राज्य सरकारला पाठविले.
शास्त्रीय संगीत पर्यटनाची सध्या गरज असून, याची दखल सरकारने घ्यावी, असे पं. कशाळकर यांनी सांगितले.

नेते चुकले तर जनता धडा शिकवतेच : शरद पवारांचे सूचक विधान, पुन्‍हा जवाहर राठोड यांच्‍या कवितेचे वाचन

ते म्हणाले, ‘शास्त्रीय संगीताची जी-जी घराणी आहेत ती महाराष्ट्रातच उदयाला आली. याव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या मातीला अनेक दिग्गज कलाकार अन् वादक लाभले आहेत, ज्यांचा जन्म महाराष्ट्रातच विविध गावांमध्ये झाला आणि त्यांची कर्मभूमी हीच आहे. या गौरवशाली परंपरेचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी, राज्यातील ज्या ज्या ठिकाणी या कलाकारांचे वास्तव्य होते आणि त्यांनी कलासाधना केली त्याची माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी सरकारने हा प्रकल्प राबवावा, असे सुचविले आहे.’

औरंगाबाद : लेबर कॉलनी अखेर भुईसपाट, १२ तासांत ३०० घरे जमीनदोस्त

लोकांना माहिती द्यावी

मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणी शास्त्रीय संगीताशी निगडित हा पर्यटन प्रकल्प राबविण्यात यावा. हा प्रकल्प दहा कोटी रुपयांचा आहे. मुंबई येथून तीन दिवसांसाठी एक बस सुरू करण्यात यावी आणि त्याअंतर्गत ठिकाणांना भेटी देण्यासह तेथील माहिती लोकांना देण्याचा प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Back to top button