पुणे जिल्ह्यात 220 कुपोषित बालके | पुढारी

पुणे जिल्ह्यात 220 कुपोषित बालके

पुणे : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण तसेच एकात्मिक बालविकासअंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात 220 बालके तीव्र कुपोषित आढळून आली आहेत. याशिवाय 741 बालके मध्यम कुपोषित असल्याचे समोर आले. उर्वरित बालके निरोगी असल्याचे या सर्वेक्षणात आढळले आहे.

जम्मू-काश्मीर : अनंतनागमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा

कोरोना तसेच पावसाळ्यामुळे कुपोषण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाने राज्यात गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली तसेच सॅम-मॅम श्रेणीतील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार जिल्ह्यात तीव्र कुपोषित आणि मध्यम कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये आतापर्यंत 77 हजार 773 मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले.

Share Market Crash : सेन्सेक्स १ हजार अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांना ५ लाख कोटींचा फटका!

कुपोषण म्हणजे काय ?

पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते त्याला कुपोषण म्हणतात. कुपोषण हा आजार नव्हे; परंतु अयोग्य आहार, उपासमार व जीवनसत्वांचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो.

मशिदींवर अजानसाठी भोंगे वापरणे हा मूलभूत अधिकार नाही : अलाहाबाद उच्च न्यायालय

जुन्नर तालुक्यात तीव्र कुपोषित बालके अधिक

या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सर्वाधिक 46 तीव्र कुपोषित बालके आढळून आली. त्या पाठोपाठ आंबेगाव तालुक्यात 31, बारामती आणि शिरूर तालुक्यात प्रत्येकी 28, दौंड आणि पुरंदर तालुक्यात प्रत्येकी 19, मावळमध्ये 14, हवेलीत 10, मुळशी तालुक्यात 8, वेल्हा येथे 7, खेड आणि इंदापूर तालुक्यात प्रत्येकी 4 तर भोरमध्ये 2 तीव्र कुपोषित बालके आढळली आहेत.

Back to top button