पिंपरी : शहरात आढळले काविळचे रूग्ण | पुढारी

पिंपरी : शहरात आढळले काविळचे रूग्ण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात काविळ आजाराने त्रस्त रूग्ण आढळू लागले आहेत. मागील आठवड्यात शहरातील दोघांचा काविळीच्या आजाराने मृत्यू झाला; मात्र काविळीने त्रस्त रूग्णांच्या संख्येबाबत महापालिकेकडे कोणताही माहिती नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

“बाळासाहेबांच्या खाल्ल्या मिठाला तरी जागा”, सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना सुनावलं

शहरात दूषित पाण्यामुळे काविळीच्या रुग्ण आढळू लागले आहेत. काही भागातील नागरिक दुषित पाणीपुरवठा होत असल्याबद्दल तक्रार करतात; मात्र त्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेवरून दिसून येते.

वाशिम : रखरखत्या उन्हातही दूरवरून डोक्यावर पाणी आणून स्मशानातील झाडे जगविणारा सुदामा

काविळीचे रुग्ण आढळत असल्याच्या संदर्भात पालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता यासंदर्भातील कोणताही माहिती अहवाल आला नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.काविळीचा आजार दूषित पाणी व कावीळ झालेल्या व्यक्तीकडून रक्त घेतल्यास म्हणजेच दूषित रक्तामुळे होऊ शकते. कावीळ होऊ नये यासाठी पाणी उकळून गार करून प्यावे. उघड्यावरचे अन्न खाऊ नये. एखाद्या आजारात रक्ताची गरज असेल तर ते रक्त योग्य ती तपासणी करूनच घ्यावे. शक्यतो घरातल्यांनी अशा वेळी आपल्या नातेवाईकास रक्तदान करावे. काविळ झाल्यानंतर आराम करणे अतिशय गरजेचे आहे. तेलकट-तुपकट पदार्थ खाऊ नयेत. हलका आहार घ्यावा. मुगाची खिचडी फलाहार घेतल्यास अधिक उत्तम.
-डॉ. सचिन शिंदे.

सातारा : ॲड. गुणरत्न सदावर्तेंना आज करणार न्यायालयात हजर

पिंपरी-चिंचवड शहरात काविळ आजाराने ग्रस्त रूग्ण आढळून येत असल्याबद्दल कोणताही डॉक्युमेंटेड रिपोर्ट माझ्याकडे नाही.
-डॉ. लक्ष्मण गोफणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी पिंपरी चिंचवड महापालिका

महाराष्ट्रातील दोन मंत्री तुरुंगात असूनही काँग्रेसचं मौन का?; जे. पी. नड्डांचा सवाल

यासंदर्भातील आकडेवारी माझ्याकडे उपलब्ध नाही.माहिती घ्यावी लागेल; मात्र काविळ आजार होवू नये म्हणून शहरवासीयांना पाणी उकळून गार करून प्यावे. शक्यतो बाहेरचे उघड्यावरचे अन्न पदार्थ खाऊ नये
-डॉ .पवन साळवे,अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी,पिंपरी चिंचवड महापालिका

Back to top button