हिंजवडीत ‘सुंदर’ने केला तिघांवर हल्ला ; बिथरलेल्या खेचरास पकडण्यात ’रेस्क्यू टीम’ला यश | पुढारी

हिंजवडीत ‘सुंदर’ने केला तिघांवर हल्ला ; बिथरलेल्या खेचरास पकडण्यात ’रेस्क्यू टीम’ला यश

हिंजवडी : पुढारी वृत्तसेवा : हिंजवडी परिसरात बिथरलेल्या सुंदर नावाच्या खेचराने मागील तीन दिवसात तिघांवर हल्ला केला होता. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांत मंगळवारी (दि.15) दिवसभर भीतीचे वातावरण होते.

अखेर भूगाव येथील ‘रेस्क्यू टीम’ ने सहा तासांच्या परिश्रमानंतर भुलीचे इंजेक्शन देत या खेचरावर नियंत्रण मिळवले व त्याला ताब्यात घेतले.

‘विधानसभा अध्यक्ष निवडीवरून भाजपचे चुकीचे राजकारण’

हिंजवडीचे माजी सरपंच मल्हारी साखरे यांच्या फार्मवर असलेल्या चार वर्षीय सुंदर नावाच्या खेचराने रविवारी दुपारी त्यांच्या फार्मवर काम करणार्‍या सिंग या कर्मचार्‍यावर प्रथम हल्ला केला.

त्यानंतर किसन निवृत्ती साखरे यांच्यावर सोमवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास शेतात काम करताना हल्ला केला. या खेचराच्या हल्ल्यात त्यांना जबर दुखापत झाली. त्यांना हिंजवडी येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण होते.

ऋषभ पंत मॅन ऑफ सीरीज ठरल्याने जडेजावर अन्याय ?

दरम्यान भूगाव येथील अ‍ॅनिमल रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट’च्या रेस्क्यू टीम’ला पाचारण करण्यात आले. यातील एका कर्मचार्‍यावर देखील चाल करत सुंदरने त्यास जखमी करण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे त्यास बेशुध्द करण्याचे रेस्क्यू टीममधील सदस्यांनी ठरवले. अखेर चार वाजता त्यास ताब्यात घेऊन भूगाव येथील रेस्क्यूच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सोनेश इंगोले, डॉ. सुश्रुत शिरभाते, डॉ. कल्याणी ठाकूर, मदतनीस सुरेश घाटगे, तय्यब सय्यद, नरेश चांडक, असीम पटेल यांनी सहभाग घेतला.

 

 

Back to top button