विधानसभा अध्यक्ष निवडीवरून भाजपचे चुकीचे राजकारण : बाळासाहेब थोरात | पुढारी

विधानसभा अध्यक्ष निवडीवरून भाजपचे चुकीचे राजकारण : बाळासाहेब थोरात

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा अध्यक्ष पद तातडीने भरले जावे, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. यासंबंधी राज्यपालांकडे विनंती केली जात असल्याची माहिती काँग्रेसचे प्रमुख नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात  (Balasaheb Thorat) यांनी मंगळवारी दिली.

मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणारे भाजप नेते गिरीश महाजन यांच्या डिपॉझिटची रक्कमही जप्त करण्यात आली होती. आता, त्यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. भाजपकडून सध्या यासंबंधी चुकीचे राजकारण सुरु आहे, असे पुढे बोलताना थोरात Balasaheb Thorat) म्हणाले.

गिरीश महाजन यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, न्यायालयाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या अपयशासंबंधी बोलताना थोरात म्हणाले की, आम्ही सर्वजण सोनिया गांधी यांच्या पाठीशी आहोत. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाची पक्षाला आणि देशाला गरज आहे. दिल्ली दौऱ्यादरम्यान पक्षश्रेष्ठींसोबत भेट घेत राज्यातील स्थितीची माहिती थोरात देणार असल्याचे कळतेय.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : पहिली मालिका ते पहिला क्रश | Rapid Fire with aayush sanjeev

Back to top button