लोकसंरव्येइतकेच शहरात मतदार | पुढारी

लोकसंरव्येइतकेच शहरात मतदार

तापकीरनगर, रहाटणी प्रभागात सर्वांत कमी; तर तळवडे, रुपीनगर प्रभागात सर्वाधिक लोकसंख्या

पिंपरी : मिलिंद कांबळे : पिंपरी-चिंचवड शहराच्या सन 2011 च्या जनगणनेनुसार सन 2022 च्या महापालिका निवडणुकीसाठी नव्याने 46 प्रभागरचना तयार करण्यात आल्या आहेत.

त्या वेळची लोकसंख्या 17 लाख 27 हजार होती, तर आजची लोकसंख्या अंदाजे 27 लाख असून, एकूण मतदार 14 लाख 50 हजार आहे. अकरा वर्षांपूर्वीच्या लोकसंख्येच्या बरोबरीने सध्याची मतदारसंख्या आहे.

PLI योजने अंतर्गत कार उत्पादक कंपन्यांची यादी जाहीर

कोरोना महामारीमुळे सन 2021 ची जनगणना झाली नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने सन 2011 च्या म्हणजे 11 वर्षांपूर्वीच्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार त्रिसदस्यीय प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तयार केला आहे.

त्या प्रभागातील लोकसंख्या सध्या खूपच कमी दिसत आहे.साधारण प्रभागात किमान 32 हजार 500 तर, कमाल 40 हजार 500 लोकसंख्या आहे. तापकीरनगर, रहाटणी प्रभाग क्रमांक 32 मध्ये सर्वांत कमी 32 हजार 584 लोकसंख्या आहे.

मुंबई : काँग्रेसच्या आंदोलनाचा निघाला फुसका बार

तर, तळवडे, रुपीनगर प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्वांधिक 40 हजार 767 लोकसंख्या आहे. चार सदस्य असलेल्या सांगवी प्रभाग क्रमांक 46 ची 46 हजार 979 लोकसंख्या आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात राहण्यास मोठी पसंती दिली जात असल्याने लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सन 1991 ची लोकसंख्या 5 लाख 17 हजार होती.

ममतादीदी भाजपाविरोधी मोट बांधणार? ; स्टॅलिन, के. चंद्रशेखर राव यांच्‍यासह उद्धव ठाकरेही सक्रीय

महापालिकेत 18 गावे समाविष्ट केल्याने आणि इतर कारणांने दहा वर्षांत सन 2001 मध्ये लोकसंख्या 10 लाख 6 हजार अशी दुप्पट झाली. त्यानंतर दहा वर्षांत सात लाखांची भर पडून सन 2011 पर्यंत 17 लाख 27 हजारांवर लोकसंख्या पोहोचली.

सन 2021 ला लोकसंख्या अंदाजे 27 लाख असल्याचे महापालिकेचा अंदाज आहे. त्यानुसार पाणीपुरवठा विभाग नियोजन करीत आहे. दहा वर्षांत तब्बल 10 लाख नागरिक वाढले. लोकसंख्या वाढीचा हा वेग सुमारे 60 टक्के इतका आहे.

सातारा : बेपत्ता पोलिस अधिकारी संग्राम ताटे बेशुध्द अवस्थेत सापडले

लोकसंख्या अधिक झपाट्याने वाढत असल्याने अकरा वर्षांपूर्वीच्या लोकसंख्येच्या तुलनेत मतदारसंख्या जवळजवळ बरोबरीपर्यंत येऊन ठेपली आहे.

जनगणनेनुसार 17 लाख 27 हजार लोकसंख्या असली तरी, मतदारांची संख्या 14 लाख 50 हजार इतकी आहे. मतदार संख्या वाढल्याने नगरसेवकांना एका प्रभागातील त्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. एका प्रभागात किमान 31 हजार 500 मतदार आहेत.

Madhubala Birth Anniversary : मधुबालाला कधीच खरं प्रेम मिळालं नाही

तर, कमाल मतदार संख्या 40 हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्रिसदस्यीय प्रभागात एका पक्षाच्या उमेदवारांच्या वाट्याला प्रत्येकी सुमारे 10 ते 12 हजार मतदार येतील.

Back to top button