पालघर : कंपनीतील बॉयलर स्फोटात कामगार ठार | पुढारी

पालघर : कंपनीतील बॉयलर स्फोटात कामगार ठार

वाडा;  पुढारी वृत्तसेवा :  वाडा तालुक्यातील मोहोट्याचा पाडा भागात असलेल्या एका कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने एक कामगार ठार झाला आहे. तर दोन कामगारांची भाजल्याने गंभीर अवस्था झाली आहे. तालुक्यातील कारखान्यांमध्ये सुरू असलेल्या
या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उसर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एका कंपनीत जुन्या टायर पासून कच्चामाल बनविण्याचा उद्योग सुरू असून शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास काही कामगार बॉयलरचे झाकण उघडण्यास गेले असता त्याचा स्फोट झाला. बॉयलरमधील गरम वाफेमुळे भाजल्याने एका
कामगाराचा मृत्यू झाला असुन दोन कामगारांवर अंबाडी येथे उपचार सुरू आहेत.

रविवारी सायंकाळी याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. बी. जाधव यांना संपर्क केला असता मी सध्या बाहेर असून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, ती प्रक्रिया सुरू असे पर्यंत जखमी व मृत कामगारांची माहिती देता येणार नाही असे त्यानी सांगितले.

Back to top button