बँकेमध्ये सिक्युरिटी गार्ड पदावर नोकरी लावण्याचे सांगून दोन कोटींची फसवणूक | पुढारी

बँकेमध्ये सिक्युरिटी गार्ड पदावर नोकरी लावण्याचे सांगून दोन कोटींची फसवणूक

पनवेल : पुढारी वृत्तसेवा : आरबीआय बँकेमध्ये सिक्युरिटी गार्ड या पदावर नोकरी लावतो असे खोटे आश्वासन देऊन 26 जणांकडून दोन कोटी 24 लाख 60 हजार पाचशे रुपये घेऊन नोकरीला लावले नाही तसेच दिलेली रक्कम परत न केल्याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात सदानंद भोसले (रा. खारघर) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित बातम्या 

संदीप चव्हाण हे ऐरोली, सेक्टर 17 येथे राहत असून ते सिक्युरिटी म्हणून नोकरी करतात. 2020 मध्ये त्यांना सदानंद भोसले यांनी आर्मी मधून रिटायर झालेल्या माजी सैनिकांना आरबीआय बँकेत नोकरी लावून दिले असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी भेटण्यासाठी बोलावले. यावेळी चार लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. काही दिवसांनी त्यांनी पैसे पाठवले. दोन महिन्यात काम होईल असे सांगून कागदपत्रे घेतली. यावेळी वैद्यकीय तपासणीसाठी पैसे मागितले. ते पैसे त्यांनी दिले. भोसले यांच्या मागणीवरून त्यांनी बँक खात्यावर सहा लाख पाच हजार रुपये पाठवले.

2022 मध्ये बँकेमधील कर्मचार्‍यांकडे सदानंद भोसले यांच्याविषयी विचारपूस केली असता भोसले यांनी नोकरीला लावतो असे सांगून 25 ते 30 जणांकडून पैसे घेऊन लोकांची फसवणूक केल्याचे समजले.

Back to top button