नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ | पुढारी

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ

नाशिक: पुढारी वृत्तसेवा: पालकमंत्री दादा भुसे यांनी चांदीच्या गणपतीची आरती करून मिरवणुकीला प्रारंभ केला. यावेळी आमदार देवयानी फरांदे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते, माजी आमदार वसंत गिते, माझी महापौर विनायक पांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित आहेत. पालकमंत्री भुसे यांनी ढोल वाजवत तसेच पारंपरिक टाळ आणि मृदंगाच्या तालावर ठेका धरला.

डीजेला परवानगी

यंदाच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह डीजेला ही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, डीजेसाठी आवाजाची मर्यादा पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. डीजेमुळे गणेश भक्तांमध्ये आनंदी वातावरण आहे.

 


हेही वाचा 

Back to top button