नाशिक : सोशल मीडियावर दाखवली बंदूक, भाऊचा वाढदिवस पोलिस कोठडीत | पुढारी

नाशिक : सोशल मीडियावर दाखवली बंदूक, भाऊचा वाढदिवस पोलिस कोठडीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सोशल मीडियावर गावठी कट्ट‌्यासह फोटो टाकणाऱ्या संशयितास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या संशयिताकडून पोलिसांनी गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुरुविंदसिंग रशपालसिंग हुंदल (१९, रा. हिरावाडी) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस नाईक विशाल देवरे यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई केली. संशयित गुरुविंदसिंग याने वाढदिवसाच्या कार्यक्रमात पिस्तूल बाळगून त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकल्याचे आढळले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रदीप म्हसदे, संदीप भांड, योगीराज गायकवाड, नाईक विशाल काठे, प्रशांत मरकड, अंमलदार पालखेडे व चालक नाझीम पठाण यांच्या पथकाने सोमवारी (दि.२५) गुरुविंदसिंग यास पकडले. त्याच्याकडून गावठी कट्टा व काडतुसे जप्त केली आहेत. त्याच्याविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :

Back to top button