जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ६ लाखांच्या घरफोड्या | पुढारी

जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ६ लाखांच्या घरफोड्या

जळगाव, पुढारी वृत्तसेवा: जळगाव जिल्ह्यातील चोपडा, चाळीसगाव, जामनेर तालुक्यात ६ लाख ५ हजार रुपयांच्या घरफोड्या झालेल्या आहेत. या प्रकरणी तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. घरफोड्या व मोटरसायकल चोरीचे प्रमाण जिल्ह्यात वाढलेले आहे. या घटनांना आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरलेले आहेत.

चोपडा शहरातील परित पार्कातील घराच्या दरवाजाचे कडी कोंडा व कुलूप तोडून संशयित आरोपी प्रशांत जगन वराडे (रा.गोरगावले) याने २ लाख ८९ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पसार झाला. याप्रकरणी सुनीता विठ्ठल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वराडे याच्याविरुद्ध चोपडा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहेत.

चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथे राहणारे साहेबराव भिला चित्ते यांच्या घराचा कडी कोंडा तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा २ लाख २६ हजारांचा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोरटे पसार झाले. या प्रकरणी साहेबराव चिकटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निघून बरे पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात केला आहे. पुढील तपास योगेश मांडोळे करीत आहेत.

जामनेर तालुक्यातील शहापूर या ठिकाणी राहत असलेले भाग्यश्री मुरलीधर विसपुते यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्यांनी गोपाल महाजन यांचे पत्र्याचे शेड राहण्यासाठी भाड्याने घेतले आहे. त्या ठिकाणी सोने घडवण्याचे ठसे घेऊन जाण्याचे उद्देशाने संशयित आरोपी विजय मधुकर भामरे (रा.पुष्प कॉलनी, वाकी रो,ड जामनेर) हा आला. त्यानंतर घर बांधकामासाठी ठेवलेले ९० हजार रुपये घेऊन तो पसार झाला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button