

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : रावेर शहरात तीन ठिकाणी झालेल्या घरफोड्या झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन वेग-वेगळ्या घटनांमधून सोने, चांदीसह रोख रक्कम चोरीला गेल्या प्राथमिक अंदाज आहे. या घटनांमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावण निर्माण झाले असून यामुळे रावेर पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.घडलेल्या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी अन्नपूर्णा सिंग, प्रभारी अधिकारी सतीष अडसुर यांनी घरफोडी केलेल्या ठिकाणची पाहणी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर शहरात वेग-वेगळ्या भागात घरफोड्या झाल्या आहे. तर काही ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न झाला. ही सर्व घटना रावेर शहरात रात्री लाईट नसतांना झाल्या. सौभाग्य नगर येथील रहीवासी असलेले प्रशांत पाटील कामा निमित्त नाशीक येथे गेले होते. दरम्यान एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला व घरात असलेल्या कपाटामधून २१ ग्रॅम सोन्याचे दागीने तर १७ भार चांदी तर २७ हजार रोख चोरीला केले.
तर दुसरी घटना देखील सौभाग्यनगर येथेच झाली. येथील अशोक प्रेमसिंग पाटील हे त्यांच्या मूळ गावी पाचोरा येथे गेले असतांना त्यांच्या घराचा कुलुप तोडून अज्ञात चोरट्यानी ४५ हजार रोख चोरुन नेले. घरमालक प्रशांत पाटील यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तिसरी घटना जिआय कॉलनी येथे घडली असून श्रीमती अटकाळे यांचे देखील बंद घर फोडण्यात आले. त्या बाहेरगावी असल्याने त्यांच्या कडे किती रुपयांचा ऐवज गेला अद्याप कळलेला नाही या घडलेल्या घटनांमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
दरम्यान तिस-या घटनेत रावेर शहरातील स्वस्त धान्य दुकाध फोडून अज्ञात चोरट्यांनी बारा हजार रुपये किंमतीचे गहू आणि तांदळाचे कट्टे चोरुन नेल्याची घटना घडली.याबाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.रावेर येथील स्टेशन रस्त्यावरील लागुन असलेल्या सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानाचे दरवाजाची कडी कोंडा रविवारीच्य रात्री चोरट्यांनी तोडून दुकानात प्रवेश केला.दुकानातील पाच हजार रुपये किंमतीचे पाच गव्हाचे कट्टे ( पोते),सात हजार दोनशे रुपये किंमतीचे सहा तांदळाचे कट्टे चोरुन नेले . या प्रकरणी सतिश धनराज पवार आणि गोपाल उर्फ कृष्णा महाजन पवार या.भोर स्टेशन यांना दोघांना अटक केली आहे याबाबत लक्ष्मण निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध भावी ४५७,३८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आली आहे.