बहुतांश राज्य गारठले ! जळगावचा पारा 9.8 अंशावर | पुढारी

बहुतांश राज्य गारठले ! जळगावचा पारा 9.8 अंशावर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील बहुतांश शहरे गारठण्यास सुरुवात झाली असून, जळगावचे तापमान राज्यात सर्वात कमी 9.8 अंशांपर्यंत खाली आले होते. त्यापाठोपाठ पुणे शहरासह विदर्भातील सर्वच शहरांचे तापमान 12 अंशांपर्यंत खाली आले होते.
पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने उत्तर भारताचे किमान तापमान 6 ते 12 अंशांपर्यंत खाली आले आहे. तसेच बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार झाल्याने राज्यात दोन्ही बाजूंनी शीतलहरी सक्रिय झाल्याने शनिवारी राज्याच्या सरासरी किमान तापमानाचा पारा 12 ते 13 अंशांपर्यंत खाली आला. जळगावचे तापमान राज्यात सर्वात कमी 9.8 अंशांपर्यंत खाली आले होते.
शनिवारी कोकण वगळता विदर्भ, मराठवाडा, उत्तर व मध्य महाराष्ट्र गारठण्यास सुरुवात झाली. थंडीची ही लाट आगामी तीन दिवस राज्यात कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

शनिवारचे किमान तापमान
जळगाव 9.8, नगर 11.4, पुणे 12.5, कोल्हापूर 17.3, महाबळेश्वर 15, मालेगाव 14.2, नाशिक 13.2, सांगली 15.6, सातारा 15, सोलापूर 15, धाराशिव 14.4, छत्रपती संभाजीनगर 12.5, परभणी 13, नांदेड, बीड 12.9, अकोला 13.8, अमरावती 13.8, बुलडाणा 13.8, चंद्रपूर 11.8, गोंदिया 12.5, नागपूर 13.8, वाशिम 11.8 .

Back to top button