जळगाव जिल्ह्याची संक्षिप्त प्रारूप मतदार यादी जाहीर : भुसावळमध्ये महिला मतदानाचा टक्का कमी | पुढारी

जळगाव जिल्ह्याची संक्षिप्त प्रारूप मतदार यादी जाहीर : भुसावळमध्ये महिला मतदानाचा टक्का कमी

जळगांव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्याची संक्षिप्त प्रारूप मतदार यादी आज (दि. २७) प्रसिद्ध करण्यात आली. यावेळी पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, जळगाव व भुसावळ या दोन्ही मतदारसंघांमध्ये महिला मतदारांची टक्केवारी ही कमी असते. लोकसभेमध्ये जळगाव व भुसावळ मध्ये सर्वाधिक मतदान होते. मात्र विधानसभेमध्ये जळगाव भुसावळ सोडून इतर विधानसभा क्षेत्रांमध्ये सर्वाधिक मतदान हे जास्त असते असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले

जळगाव जिल्ह्यातील संक्षिप्त प्रारूप मतदान यादी प्रसिद्ध झाली आहे. एकूण 34 लाख 73 हजार 383 मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये पुरुष मतदार 17 लाख 99 हजार 290 तर महिला मतदार 16 लाख 57 हजार 76 मतदार आहेत. जळगाव जिल्ह्यात 3564 मतदान केंद्र असणार आहेत.

जळगाव भुसावळमध्ये चार टक्के मतदान हे महिलांचे पुरुषांपेक्षा कमी असते लोकसभा मध्ये जळगाव भुसावळ सर्वाधिक मतदान जास्त होते मात्र विधानसभेमध्ये भुसावळ आणि जळगाव या दोन्ही विधानसभांमध्ये मतदानाची आकडेवारी ही कमी असते जिल्ह्यामध्ये 18 19 20 ही युवा मतदारांची मतदार नोंदणी कमी आहे.

 66 मतदान केंद्रांच्या नावांमध्ये बदल झालेला आहे तर 240 मतदान केंद्राची ठिकाणे बदललेली आहेत. नागरिक 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर २०२३ पर्यंत मतदान यादीमध्ये हरकती व आक्षेप आपापल्या प्रांत कार्यालय किंवा तहसील कार्यालयामध्ये नोंदवू शकतात. तरी मतदारांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी प्रारूप मतदार यादीमध्ये आपली नावे आहेत की नाही याची तपासणी करून घ्यावी जर नावे नसतील तर संबंधित तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयात जाऊन त्याबाबत हरकती घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे

Back to top button