ACB : जळगावमध्ये ४१ लाचखोरांना भोवला वरकमाईचा मोह | पुढारी

ACB : जळगावमध्ये ४१ लाचखोरांना भोवला वरकमाईचा मोह

जळगाव, पुढारी ऑनलाईन : जळगाव जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्षभरात केलेल्या कारवाईमध्ये पोलीस विभागातील कर्मचारी सर्वाधिक पकडले गेले आहे. त्यानंतर महसूल विभागाचा क्रमांक लागत आहे. शासकीय कार्यालयात ३३ लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. यामध्ये जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी आघाडी घेतली आहे. तर ३३ प्रकरणांत ४१ अधिकारी कर्मचार्‍यांसह खासगी इसमांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (ACB)

लाचखोरीत नाशिक विभागात नगर जिल्ह्यांत ३४ तर, जळगाव जिल्ह्यात ३३ लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. वरकमाईची ३३ प्रकरणांची नोंद असून यावर्षी जुलैनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी वेळोवेळी जनप्रबोधन आणि आवाहन केल्यामुळे नागरिकांसह लाचलुचपतच्या अधिकार्‍यांच्या सजगतेमुळे ३३ प्रकरणे उघडकीस आली.

यामध्ये पोलीस विभागात ११ लाचखोरीची प्रकरणे आहेत. यात ११ पोलीस कर्मचार्‍यांसह १ पोलीस पाटील व १ होमगार्डचा समावेश आहे. दुसर्‍या क्रमांकावर जि.प.विभाग असून शिक्षण, बांधकाम, ग्रामपंचायत व पंचायत समिती असे ७ कर्मचारी आहेत. तिसर्‍या क्रमांकावर महसूल मधील २ तलाठी व १ कोतवाल तर सार्वजनिक बांधकामचे ३ आहे. महावितरणचे ३, नगरपरिषद २, दुय्यम निबंधक विभाग १, जिल्हा उद्योग केंद्र १, महाराष्ट जीवन प्राधिकरण १, न्यायालय १, पाटबंधारे विभाग १ आरटीओ मधील २ खाजगी पंटर, उपजिल्हा रूग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देणारे खासगी पंटर २, आणि शासनाच्या कंत्राटी सेवेतील डॉक्टर १ असे ४१ लाचखोरांना जेरबंद करण्यात आले आहे. (ACB)

गेल्या पाच वर्षांचा आलेख पाहाता २०१६ मध्ये सर्वात जास्त ४०, २०१७-२६, २०१८-३०, २०१९-३१, २०२०-२० तर २०२१ मध्ये हा आलेख पुन्हा वाढला असून तब्बल ३३ गुन्हे उघडकीस आली यात अभियंता, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, जि.प.शिक्षण, बांधकाम, नगरपरिषद मुख्याधिकारी, वा अन्य असे श्रेणी २ व ३ चे अधिकारी कर्मचार्‍यांसह खासगी इसम असे ४१ लाचखोरांवर संक्रांत आली आहे.

पहा व्हीडिओ : 5 दिवसांचा प्रवास आणि गव्याच्या सुटकेचा थरार

Back to top button