Hemangi kavi : हेमांगी कवीच्या हॉट शुभेच्छा आणि ‘पाण्यात आग’ (video) | पुढारी

Hemangi kavi : हेमांगी कवीच्या हॉट शुभेच्छा आणि 'पाण्यात आग' (video)

पुढारी ऑनालाईन : मराठी अभिनेत्री हेमांगी कवी ( Hemangi kavi ) नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असते. मनमाेकळ्या बाेलण्‍यामुळे ती ओळखली जाते. सध्या तिने हॉट फोटो शेअर करून नववर्षाचे स्वागत केले आहे. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

नुकतेच हेमांगी कवीने आपल्या इंन्स्टाग्रामवर लाल रंगाच्या बिकिनीमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत हेमांगी एका स्विमिंग पुलाच्या जवळ सुट्यांची आनंद घेताना दिसली आहे. या फोटोसोबत तिने गेलेल्या २०२१ वर्षाला रामराम करत येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. हे फोटो शेअर करत आपल्या सर्व चाहत्यांना नववर्ष २०२२ च्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘सर्वांना नवीन वर्षाच्या खूप- खूप शुभेच्छा! Rock it! ☺️. येणाऱ्या नवीन वर्षात तंदुरुस्त राहा. तुमची स्वप्ने पूर्ण करा. नेहमी हसत रहा.’ लिहित तिने चाहत्यांना अनोखा सल्ला दिला आहे. यातील व्हिडिओत लाल रंगाच्या बिकिनीसोबत ती रोमॉटिक मुडमध्ये स्वत: च्या भोवती फिरताना दिसली. या व्हिडिओतील खास म्हणजे, यावेळी तिच्या पाठीमागे एक पाण्याचा झरा दिसत आहे. तर ती आणखी एका फोटोत बिकिनीत पाण्यात बसून तिने पोझ दिली आहे. यासोबत तिने आपले केस मोकळे सोडले आहेत.

हा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका युजर्सने ”काकू’ ची हवा आहे’, तर दुसऱ्या एका युजर्सने ‘ताई काय ऐकत नाही राव’ असे लिहिले आहे. याशिवाय आणखी एकाने ‘नववर्षाच्या शुभेच्छा. तुम्हची स्माईल खूपच क्यूट आहे’. असे म्हटले आहे. याशिवाय चाहत्यांनी हार्ट आणि फायरचा ईमोजी शेअर केला आहे.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केलेली पाेस्‍टही चर्चेत

याआधी नुकतंच हेमांगीने तिच्या लग्नाच्या वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त तिने फेसबूकवर एक पोस्ट लिहिली होती. तिची ही पोस्ट खूपच व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये लिहिले होतं की, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! या वर्षांपासून आपल्या लग्नाला किती वर्षे झाली बोलून वर्ष मोजायची नाहीत तर प्रत्येक क्षण जगायचा! एकमेकांना सहन करत आलो वगैरे तर मुळीच म्हणणार नाही कारण आपल्याला माहितेय आपण कसे आहोत आणि काय आहोत एकमेकांसाठी आणि हे माहीत असणंच जास्त महत्वाचं आहे.

आपल्या संसाराच्या सुरवातीच्या काळात माझं चिडणं तुझं कमालीचं शांत असणं, मी अति romantic तू unromantic असणं, मी अति practical तू तेवढाच emotional असणं, मी चंगुस तू खर्चिक असणं. इतक्या वर्षाच्या सहवासमुळे आपल्यातली ही विसंगती सुसंगतीत बदल्याचं श्रेय आपल्या दोघांचं! कुठल्याही परिस्थितीत एकमेकांची साथ सोडायची नाही हे इतक्या वर्षात आपल्याला जमलंय, या पुढे ही जमवू तेवढा समंजसपणा दोघांना ही लाभो!

आतापर्यंत आपल्या दोघांच्याही आयुष्यात मोहाचे क्षण आले असतील, पुढे ही येतील पण तरीही त्या उपर जाऊन आपण एकमेकांना निवडलंय आणि निवडू कुठल्याही आसक्ती शिवाय यातच आपल्या प्रेमाचं, संसाराचं यश आहे. एकमेकांना जिंकल्याचं प्रतीक आहे.
एकमेकांशिवाय राहू शकत नाही ते आता… एकमेकांना सोडू शकत नाही दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! ☺️ भांडत राहू, वाईट परिस्थितीशी झगडत राहू, आनंदी राहू, समाधानी राहू! Sandeep Dhumal ❤️ #आमचामाणूस #हमाराआदमी #happyanniversary #25thdecember.’

याशिवाय हेमांगी कवी नेहमी सोशल मीडियावर आपले हटके फोटो शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते. तिने अनेक मराछी चित्रपटात काम कलं आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button