suicide : जळगावात एकाच कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न, तिघांची प्रकृती चिंताजनक | पुढारी

suicide : जळगावात एकाच कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न, तिघांची प्रकृती चिंताजनक

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा

भुसावळ येथे आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्येचा (suicide) प्रयत्न केल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. या सर्वांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

या विषयी अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील वांजोळा रोडवरील प्रेरणानगर मागे गोकूळधाम रेसिडेन्सीत रिक्षाचालक विलास प्रदीप भोळे (वय ६०), पत्नी लताबाई विलास भोळे (वय ५२), मुलगी प्रेरणा विलास भोळे (वय २८) आणि मुलगा चेतन विलास भोळे (वय २७) हे राहतात. शुक्रवारी दिवसभर भोळे यांचे घर बंद असल्याने परिसरातील रहिवाशांना शंका आली. त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, कोणीही प्रतिसाद देत नव्हते. चेतनच्या मोबाइलवरही संपर्क साधून प्रतिसाद नसल्याने रहिवाशांनी रात्री साडेअकरा वाजता पोलिसांना या विषयी माहिती दिली.

यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता, रिक्षाचालक विलास भोळेंसह परिवारातील चारही सदस्य बेशुद्ध अवस्‍थेत आढळले. यानंतर या चौघांना डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालयात हलवण्यात आले. यातील विलास भोळे वगळता कुटुंबातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

दरम्यान, घरात पोलिसांना सुसाईड नोट आढळली असून, यात आर्थिक विवंचनेतून आपण (suicide) आत्‍महत्‍येचे  पाऊल उचलत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हे वाचा :

Back to top button