डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय हा अन्य तीन गुन्ह्यांच्या खटल्यावरदेखील परिणाम करणारा असून, खुनातील मूळ सूत्रधारापर्यंत पोहोचणे आणि त्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे. हल्लेखोरांना फाशीची शिक्षा देता येणार नाही असे न्यायालयाने सांगितले असले, तरी व्यक्तीश: फाशीची शिक्षा मानवतेला धरून नसल्याने आम्ही त्या विरोधात आहे. मात्र, अधिकाधिक जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने हल्लेखोरांना सुनावली आहे. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याची सुटका झाली असली, तरी कॉम—ेड गोविंद पानसरे खून खटल्यातदेखील त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासात तपासणी यंत्रणांनी सबळ पुरावे न्यायालयात निदर्शनास आणावेत. विवेक वाद्यांवरील व्यापक हल्ले कटाचा हा भाग आहे. डॉ. दाभोलकर प्रकरणात गुन्हेगारांचा सहभाग निष्पन्न होणे ही महत्त्वपूर्ण बाब आहे.– मेधा पानसरे, गोविंद पानसरे यांची सून.प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपींना न्यायालयात ओळखले होते. सीबीआयच्या वकिलांनी आरोपी यांच्याविरुद्ध न्यायालयात पुरावे दिले होते. तिघांविरुद्ध सीबीआयला विनंती करून उच्च न्यायालयात जाऊ. आमच्या दृष्टीने तिघांविरुद्धदेखील पुरावे आहेत आणि त्यांना शिक्षा लागणेही गरजेचे आहे.– डॉ ओंकार नेवगी, दाभोलकरांचे वकील.डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याविरोधात आमच्याकडे पुरावे होते. कोल्हापूरचा सराफा व्यावसायिक साडविलकर या एका साक्षीदाराने तावडेविरुद्ध साक्ष दिली होती. पण तरीही आम्ही या निकालाचे स्वागत करतो.– प्रकाश सूर्यवंशी, सीबीआयचे वकील.वेळोवेळी आरोपी बदलविण्यात आले. प्रत्यक्ष साक्षीदारांच्या आधारावर ही शिक्षा दिली गेली. ती ग्राह्य धरू नये, असा आमचा युक्तिवाद होता. पण आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू. अंदुरे आणि कळसकर नक्की सुटतील. जे घडले ते दुर्दैवीच आहे. पण म्हणून कुणालाही दोषी ठरविणार का ? आम्ही खुनाचे समर्थन करणारे युक्तिवाद केले नाहीत. पण न्यायालयाला असे वाटले असेल आम्ही त्याचा आदर करतो.– अॅड. प्रकाश साळसिंगीकर, बचाव पक्षाचे वकील.
हेही वाचा