Nashik Teachers Constituency | मतदानाच्या दिवशी शिक्षकांना विशेष रजा जाहीर | पुढारी

Nashik Teachers Constituency | मतदानाच्या दिवशी शिक्षकांना विशेष रजा जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये दि. 26 जून रोजी मतदान होणार आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिक्षक मतदार मर्यादित स्वरूपात आहे. त्यामुळे शिक्षक त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.

लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी भरपगारी सुटी देण्याची तरतूद आहे. मात्र शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार मर्यादित स्वरूपात आहेत. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार शिक्षक मतदारांसाठी मतदानाकरिता विशेष नैमित्तिक रजा जाहीर केली आहे. ही रजा शिक्षक मतदारांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे. मतदारांना सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान करता येणार आहे. निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 25,302 शिक्षक मतदार असून, त्यांच्यासाठी जिल्ह्यात 29 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी मतदार म्हणून नोंदणी केलेल्या शिक्षक मतदारांनी मतदानाकरिता मिळालेल्या या विशेष नैमित्तिक रजा सवलतीचा लाभ घेत अवश्य मतदान करावे, असे आवाहन जलज शर्मा यांनी केले आहे.

हेही वाचा-

Back to top button