‘कल्याणची चुलबुली’ शिवाली परबचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अंदाज | पुढारी

'कल्याणची चुलबुली' शिवाली परबचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब सोशल मीडियावर नेहमीचं ॲक्टिव्ह असते. तिचे व्हिडिओ आणि फोटो ती सोशल अकाऊंट्सवर शेअर करत असते. उत्तम अभिनय आणि कॉमिक टाईमिग साधत ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आहे. कल्याणची चुलबुली शिवाली अशी प्रतिमा असलेल्या शिवालीने आता बोल्ड अंदाजात फोटो शेअर केले आहेत.

अधिक वाचा-

शिवाली परबचे हॉट फोटो

शिवालीने ऑफ शोल्डर ब्लॅक कलर टॉपमध्ये बोल्ड फोटोशूट केला आहे. तिने शिवाली परब इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे. तिने याआधीही काही खास फोटो पोस्ट केले आहेत.शिवाली परबने काढलेले हे फोटोही चर्चेत आले होते. या फोटोंमध्येही ती हॉट आणि खास दिसते आहे. डोन्ट स्वाईप अशी तिने कॅप्शन दिलीय. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसतेय.

अधिक वाचा-

शिवाली परबने नवं घर घेतलं मुंबईत

काही दिवसांपूर्वी शिवालीने मुंबईत नवं घर घेतलं होतं. वाढदिवसादिवशी आणि अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर तिने नव्या घरात प्रवेश केला होता. यावेळी तिच्या घरातील पुजेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. शिवालीच्या नवीन घराच्या दारावर लावलेल्या ‘परब’ असं लिहिलेल्या या नेमप्लेटवर सर्वाचे लक्ष वेधलं गेलं. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं- इतके वर्ष भाड्याच्या घरात राहिलो. हा प्रवास चाळीतून थेट मोठ्या बिल्डिंगच्या २ बीएचके अपार्टमेंटपर्यंतचा होता. प्रवास खूप गोड होता.

अधिक वाचा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivali Parab (@parabshivali)

Back to top button