मोठी बातमी | शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात ! | पुढारी

मोठी बातमी | शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात !

जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. पवार हे चोपडा येथील प्रचार सभा करून भुसावळकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांची चोपडा येथील सभा आटोपल्यानंतर  ते भुसावळ येथील बैठकीला जात असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील किनगाव जवळ शरद पवार यांच्या मागे आलेल्या (एमएच १५ सीएम ९२७६) आणि (एमएच ४८ एस ५८९५) दोन वाहनांचा अपघात झाला. दोनही गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात दोनही वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही.

हेही वाचा –

Back to top button