Jalgaon water scarcity | जिल्ह्यात चाळीसगाव, अमळनेर भागात सर्वांधिक पाणीटंचाई; सात तालुक्यांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा | पुढारी

Jalgaon water scarcity | जिल्ह्यात चाळीसगाव, अमळनेर भागात सर्वांधिक पाणीटंचाई; सात तालुक्यांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा

जळगाव, नरेंद्र पाटील- जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक वेगळे राजकारण सुरू आहे. राजकारणाचे सत्ता केंद्र म्हणून सध्याला ओळखले जाणारे चाळीसगाव, अमळनेर, जामनेर हे ठिकाण आहे. चाळीसगाव अमळनेर याठिकाणी सर्वाधिक पाणीटंचाई आहे. तेथे टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील छप्पन गावे व सात पाडे या ठिकाणी 83 टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव, जामनेर, अंमळनेर, जळगाव ग्रामीण ही सध्या सत्ता केंद्र आहे. चाळीसगाव या लोकसभेमध्ये खूप गाजत आहे. भाजपाकडून मंगेश चव्हाण हे नेतृत्व करीत आहेत. तर भाजपचे माजी खासदार व विद्यमान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात गेलेले उन्मेष पाटील हे चाळीसगाव वरूनच जळगाव लोकसभेचे आखणी करीत आहे. जळगाव लोकसभेचे आखणी चाळीसगाव वरून होत असल्याने महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यात पाण्याच्या बाबतीत सर्वांधिक संकट हे चाळीसगाव व चाळीसगाव तालुक्यात आहे. तर चाळीसगाव तालुक्यामध्ये 43 टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

यानंतर अमळनेर या तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण झालेली. जेव्हा की या ठिकाणी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्या मतदारसंघ आहे तरी या ठिकाणी 22 टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तापी नदीच्या काठावर असलेले कंडारी गाव आहे. मात्र या कंडारी शिवारमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. एप्रिल महिन्यामध्ये अशी परिस्थिती असताना मे व जूनमध्ये यापेक्षा अधिक तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.

या सात तालुक्यातील पाणीटंचाईच्या गावांमध्ये जलजीवन मिशनचे काम सुरू आहे मात्र हे काम दहा टक्के ते 90 टक्के पर्यंत झालेले आहेत. यामधील एकच गाव मध्ये शंभर टक्के काम झालेले आहे. सात तालुक्यातील 56 गावे सात पाडे यांना 83 ट्रॅक्टर सुरू आहे. त्यामध्ये 75 खाजगी, आठ शासकीय टँकरने या गावांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे.

अमळनेर. —-, निसडी, लोणपंचम ,नगाव बुद्रुक, आडीआनोरे, लोन बुद्रुक, देवगाव देवडी नगाव खुर्द, सबगव्हाण ,डांगर बुद्रुक, भरवस, अचलवाडी, पिपळखुर्द चिमणपुरी अटाळे, शिरसाळे बुद्रुक व शिरसाळे खुर्द तळवाडे, गलवाडे बुद्रुक लोनचामर

भुसावळ — कंडारी शिवार
जामनेर— -रोटावद व मोरगाव, काळखेडे
पारोळा—खेडी ढोक हनुमंत खेडे
जळगाव —शिरसोली प्र. न, सुभाष वाडी, लोणीवाडी बुद्रुक वराड कनेरे ब्राह्मण शेवगे ग्रामपंचायत ( नाईक नगर तांडा नंबर एक)
चाळीसगाव—- हातगाव, कंजरगाव ,कृष्णा नगर ,ब्राह्मण शेवगे रोहिणी ,तमगव्हाण ,राजदोहरे ,हिरापूर घोडेगाव हादगाव ग्रामपंचायत (विसापूरताडा),हादगाव ग्रामपंचायत(भिल वस्ती) अंधारी, खराडी, पिंपरी बुद्रुक ,डोणदिगर, तळेगाव, न्हावे ,ढोमणे पिंपळगाव, माळशेवगे , शिंदी, शेवरी ,शिंदी ग्रामपंचायत (चत्रभुज) बिलाखेड , शिरसगाव ,जूनपाणी, पिंपळवाड निकुंभ, चिच गव्हाण, कळमडू ग्रामपंचायत (अभोणे तांडा) सुंदर नगर भडगाव —-अंचळगाव ग्रामपंचायत (ताडबंद तांडा) (वसत वाडी) अंचलगाव

तालुका. टँकर.

अमळनेर. 22
भुसावल 01
जामनेर 03
पारोळा. 02
जळगाव. 08
चाळीसगाव 43
भडगाव. 03

जिल्ह्यातील गावामध्ये व ताड्या वर जल जीवन मिशन चे सुरू असलेली कामे

5 टक्के —- शिदी, चत्रभुज तांडा, भरवस, चिचगव्हाण सुंदरनगर
दहा टक्के—देवगाव देवळी
25 टक्के — आचळगाव (तळबद ताडा) वसंतवाडी शिरसाळे बुद्रुक व खुर्द गलवाडे बुद्रुक ,खडीढाके
30टक्के. — तळोदे प्र दे
35 टक्के. हनुमंत खेडे
40 टक्के. लोन चरण तांडा
50 टक्के — माळशेवगे शेवरी लोणवाडी बुद्रुक वराड, सुभाष वाडी
60 टक्के — मोरगाव शिरसोली प्र न, अभोणेतांडा, नाईक नगर तांडा नंबर एक , काळखेडे, हातगाव, कंजर गाव, कृष्णा नगर ब्राह्मणी शेवगे रोहिणी शिरपूर, हिरापूर ,घोडेगाव, हातगाव ग्रामपंचायत, अंधारी,हातगाव ग्रामपंचायत, खराडी पिंपरी बुद्रुक डोणदिगर तळेगाव ,न्हावे, पिंपगाव, बिलाखेड शिरसगाव
65 टक्के — तळवाडे रोटवद
70 टक्के — तमगव्हाण , लोणपंचम, आडीआनोरे, लोन बुद्रुक नगाव सबगव्हाण कंडारी शिवार
80 टक्के — न्हावे, ढोमणे, जून पाणी पिंपळवाडी निकुंभ निसडी ,नगाव बुद्रुक ,अचलवाडी ,अटाळो
85 टक्के — राज देहरे
90 टक्के — पिंपळे खुर्द चिमणपुरी कन्हेरे
100 टक्के —— डांगर बुद्रुक

Back to top button