जळगाव व रावेरसाठी चौथ्या दिवशी किती उमेदवारांनी किती अर्ज घेतले, वाचा… | पुढारी

जळगाव व रावेरसाठी चौथ्या दिवशी किती उमेदवारांनी किती अर्ज घेतले, वाचा...

जळगांव- लोकसभा निवडणूक 2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर चौथ्या दिवशी दि. 22 रोजी जळगाव लोकसभेसाठी 09 उमेदवारांनी 22 अर्ज घेतले. तर रावेर लोकसभेसाठी 08 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले. तर चौथ्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी मुकेश मुलचंद कोळी या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी संजय प्रल्हाद कांडेलकर, मुक्ताईनगर (अपक्ष) यांनी 03 उमेदवारी अर्ज दाखल केले. तर प्रवीण लक्ष्मण पाटील, मलकापूर या अपक्ष उमेदवाराने एक अर्ज दाखल केला. असे जळगांव व रावेर लोकसभा मतदार संघात सोमवारी एकूण 05 अर्ज दाखल झाले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक साठी दि. 22 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 09 उमेदवारांनी 22 अर्ज घेतले आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 08 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघा साठी मुकेश मुलचंद कोळी, शिरसोली, प्र. न, तालुका जळगाव या अपक्ष उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघ यांचेकडे जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी चा आपला उमेदवारी अर्ज सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी दाखल केला. तर 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी संजय प्रल्हाद कांडेलकर, मुक्ताईनगर (अपक्ष )यांनी 03 उमेदवारी अर्ज दाखल केले. तर प्रवीण लक्ष्मण पाटील, मलकापूर या अपक्ष उमेदवाराने एक अर्ज दाखल केला. सोमवार दिनांक 22 रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 01 तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 04 असे एकूण 05 अर्ज सोमवारी दिवसभरात दाखल झाले.

हेही वाचा –

Back to top button