Lok Sabha Election 2024 | बीजेपी’चे राज्यभर बूथ विजय अभियान, लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी | पुढारी

Lok Sabha Election 2024 | बीजेपी'चे राज्यभर बूथ विजय अभियान, लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी

धुळे : पुढारी वृत्तसेवा-लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर तीन एप्रिलपासून सहादिवसीय ‘बूथ विजय अभियान राबविण्यात येत आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी दिली. सहादिवसीय बूथ विजय अभियानांतर्गत आज येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, भाजपचे जिल्हा महामंत्री यशवंत येवलेकर, जिल्हा प्रवक्ता श्यामसुंदर पाटील, भाजयुमोचे महानगर जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी आदी उपस्थित होते.( Lok Sabha Election 2024 )

पेशकार म्हणाले, की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ४०० पारचा नारा दिला आहे. तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना प्रत्येक बूथवर गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा ३७० मते वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचे मताधिक्य वाढविण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रदीप पेशकार यांनी सांगितले. (Lok Sabha Election 2024 )

बूथ विजय अभियाना अंतर्गत समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य असून प्रत्येक बूथवर या ६ दिवसांत विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत, अशी माहिती प्रदीप पेशकार यांनी दिली. घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणे, प्रत्येक घर व वाहनावर स्टिकर्स लावणे, लाभार्थ्यांशी नियमित संपर्कात राहणे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपाचा झेंड़ा लावणे आदी उपक्रम राबवले जातील. युवा वर्ग, महिला असे समाजातील विविध घटकांसाठी ५ समूह बैठकाही घेण्यात येतील, अशी माहिती श्री. पेशकार यांनी दिली.

१०० हून अधिक जणांचा व्हॉट्स अॅप ग्रुप (Lok Sabha Election 2024 )

भाजपविरोधी समजल्या जाणाऱ्या मतदारांपर्यंत मोदी सरकारचे कार्य, योजना पोहोचवून भाजपला मत देण्यासाठी, त्यांचे मन वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. बूथपासून दूर राहणाऱ्या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येईल. पेशकार म्हणाले, की बूथ समिती व पन्नाप्रमुखांची नियुक्ती तसेच १०० हून अधिक जणांचा व्हॉट्स अॅप ग्रुप बनवण्यात येईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बूथ कार्यकर्ते व पन्नाप्रमुखांचे संमेलन घेण्यात येणार असून, संमेलनाला उपस्थित प्रत्येक बूथ अध्यक्षाला त्या- त्या बूथनुसार मतांमधील वाटा किती असायला हवा, तसेच मागच्या ३ निवडणुकांमधील मतदानाची आकडेवारी व आवश्यक माहिती देण्यात येणार आहे. संमेलनामध्ये बूथ समिती व पन्नाप्रमुखांकडून अपेक्षित असलेल्या कार्यावर व जबाबदारीबाबत विस्तृत चर्चाही होतील,
असेही पेशकार यांनी नमूद केले.

हेही वाचा –

Back to top button