Lok Sabha Election 2024 : जळगाव, रावेरमध्ये महिलांच्या राजकारणात पुरुषांची नाराजी बाहेर | पुढारी

Lok Sabha Election 2024 : जळगाव, रावेरमध्ये महिलांच्या राजकारणात पुरुषांची नाराजी बाहेर

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या दोन्ही लोकसभा मतदारसंघात एक महिला व एक पुरुष असे उमेदवार असायचे. त्यापूर्वी दोन्ही जागेंवर पुरुष उमेदवार असायचे मात्र यावेळी प्रथमच शंभर टक्के आरक्षण देऊन दोन्ही जागांवर भाजपाने आघाडी घेत महिला उमेदवार जाहीर केले आहे. मात्र उमेदवार जाहीर होताच दोन्ही लोकसभा मतदारसंघातून बंडाचे सूर बाहेर येऊ लागले आहेत. हे सुर इथपर्यंत आले की कोअर कमिटीच्या बैठकीत झालेल्या चर्चेचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन यांनाही डॅमेज कंट्रोल थांबविण्यात यश आलेले नसल्याचे दिसते. मात्र तरी ते म्हणत आहे की सर्व अलबेल आहे. सर्व पक्षाचे काम करणार आहे, पण मग पक्षानेच दिलेल्या उमेदवारांवर आक्षेप का? की पुन्हा मागच्या सारखं शेवटच्या दिवशी पत्ता कट करून नवीन उमेदवार द्यायचे आणि तो वरिष्ठांचा निर्णय होता असे सांगून महाजन मोकळे होतील. याला म्हणतात राजकारण, सापही मेला आणि लाठी पण तुटली नाही. अशीच चर्चा सध्या मतदारसंघातही सुरु आहे.

जळगाव लोकसभेसाठी स्मिता वाघ, रावेर लोकसभेसाठी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची नावे जाहीर झालेली आहे. भाजपाने आपले उमेदवार जाहीर करताना जळगाव लोकसभेत महिलांना प्राधान्य देण्याच्या संकल्पनेतून जळगांव जिल्हयात दोन्ही उमेदवार या महिला दिलेल्या आहेत. आजपर्यंत खडसे हे आडनाव घेऊन रक्षा खडसे मैदानात उतरत असत मात्र त्यांचे बाबा म्हणजे सासरे एकनाथ खडसे  त्यांची ढाल होती. ती ढाल आता राष्ट्रवादीत गेल्यामुळे रक्षा खडसेंना प्रत्येक मोर्चावर स्वतः पुढाकार घेऊन लढावे लागते आहे. खडसेंच्या कारकिर्दीमध्ये नाराज असलेले कार्यकर्ते जे कधी काही बोलू शकत नव्हते ते आज कोअर कमिटीच्या बैठकीत आपले म्हणणे मांडत आहे. रक्षा खडसेंवरची नाराज व्यक्त करीत आहे.

तर दुसरीकडे स्मिता वाघ यांना पुन्हा जळगाव लोकसभेतून संधी मिळाली आहे. त्यांचे ही नाव जाहीर झाल्यावर जळगाव तालुका, चाळीसगाव एरंडोल पारोळा या तालुक्यातील विरोध वाढला आहे. तर काही गावातील ग्रामस्थांनी तर मतदान न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. उन्मेश पाटलांना पुन्हा तिकीट देण्यात यावा अशी या गावकऱ्यांची मागणी होती. दुसरीकडे भाजपाच्या कोणत्याच कार्यक्रमाचे सध्याला दिसत नाहीये. असेही दिसत आहे ते उबाठा च्या संपर्कात आहे. तर दुसरीकडे माजी खासदार एटी नाना पाटील सुद्धा मैदानात येण्याच्या तयारीने उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. काल तर म्हणे शरद पवारांना बरोबर त्यांची चर्चा सुरू असल्याचे माहिती समोर आली. यामुळे भाजपचे अंतर्गत जे वाद होते ते प्रथमच चव्हाट्यावर आलेले दिसून येत आहे. जिल्ह्याचे नेते व मंत्री गिरीश महाजन हे पाहिजे तसे कंट्रोल करू शकलेले दिसून येत नाही आहे. ते जरी म्हणत असले की सर्व अलबेल आहे. परंतु नाराज कार्यकर्ते खरंच भाजपाचे काम करतील का? कारण भाजपने उमेदवार जाहीर केलेले आहेत. आज सर्व प्रकार गिरीश महाजन यांच्या समोर घडत आहे व गिरीश महाजन सर्व सोडा कामाला लागा एवढेच म्हणत आहे. पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना भाजपाने नेहमीच शिस्तीचे पाठ शिकवला आहे. मात्र या वेळेस तसे काही चित्र दिसून येत नाही आहे. वर कमिटीच्या बैठकीचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. याचाच अर्थ भाजपात किती नाराजी आहे व कसे वाद सुरू आहेत. रक्षा खडसेंच्या विरोधात कोण कोण नाराज आहेत. हे दाखवण्याचा प्रयत्न मतदारांना किंवा वरिष्ठांना सुरू आहे का? असा प्रश्न पडतो आहे.

महाविकास आघाडी उमेदवार अजूनही शोधत आहे. तर दुसरीकडे भाजपाने आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. उमेदवार जाहीर करून प्रचाराचे आघाडी घेण्यापेक्षा वादात भाजप पडले आहे. तर महाविकास आघाडी कोणता उमेदवार द्यावा यावर विचार मंथन करताना वेळ वाया घालवत आहे. सक्षम उमेदवार कोणताही समोर आलेला दिसून येत नाही आहे. जळगाव लोकसभा ही महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडे आहे. या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर हर्षल माने भाजपातून शिवसेनेत गेलेल्या एडवोकेट ललिता पाटील, भाजपातून ज्यांचे तिकीट कापले गेले होते असे दोन विद्यमान व माजी नेते संपर्कात असल्याची चर्चा आहे. रावेर लोकसभेमध्ये रक्षा खडसेंच्या विरोधात महाविकास आघाडीचे नेत्यांचे नावाची चर्चा सुरू आहे. यात जाहीर न झालेले मात्र सर्वात चर्चेत असलेले नाव म्हणजे राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी आहेत. दुसरे नाव नेहमीप्रमाणे रवींद्र भैय्या पाटील यांच्या नावाच्या ठराव झाल्याची ही चर्चा आहे. रवींद्र भैय्या पाटील यांनी रक्षा खडसेंना जोरदार टक्कर दिली होती मात्र तरी त्यांचा लाखाच्या आसपास मतांनी पराभव झाला होता. बंद डब्यातील नावे बाहेर आलेली नाही. या चर्चेत नेत्यांपेक्षा अजून वेगळे नाव समोर येईल हे कोणीच सांगू शकत नाही.

Back to top button