Dhule Lok Sabha Election 2024 : संधी मिळाल्यास धुळ्याच्या मैदानात उतरु : 'एमआयएम' आमदार मुफ्ती यांचे संकेत | पुढारी

Dhule Lok Sabha Election 2024 : संधी मिळाल्यास धुळ्याच्या मैदानात उतरु : 'एमआयएम' आमदार मुफ्ती यांचे संकेत

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात ‘एआयएमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांनी सहा जागा लढविण्याचे संकेत दिले आहेत. या सहा जागांमध्ये धुळे लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात मालेगाव मध्य, बाह्य, धुळे’शहर व ग्रामीण, शिंदखेडा, बागलाण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यात मुस्लीम, दलित व आदिवासी मतदान हे निर्णायक आहे. हे एकगठ्ठा मतदान पडल्यास तसेच हिंदू मतांची विभागणी झाल्यास ‘एमआयएम’चा उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर धुळे मतदारसंघातून उमेदवारीबाबत ‘मालेगाव मध्य’चे आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष ओवेसी व वरिष्ठ नेते घेतील. पक्ष नेतृत्वाला माझ्यावर विश्वास असून उमेदवारांच्या यादीत माझे नाव असल्याचे समजते. पक्षाने निवडणूक लढविण्याचा आदेश दिल्यास उमेदवारी करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे त्यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा-

Back to top button