Dhule News : साक्री नगरपंचायत विषय समिती सभापती निवडप्रक्रिया बिनविरोध ; यांची लागली वर्णी | पुढारी

Dhule News : साक्री नगरपंचायत विषय समिती सभापती निवडप्रक्रिया बिनविरोध ; यांची लागली वर्णी

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- साक्री येथील नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांची सभापती निवडप्रक्रिया पार पडली. यात नियोजन आणि विकास समिती सभापतिपदी उपनगराध्यक्ष बापू गिते, सार्वजनिक बांधकाम समिती सभापतिपदी उज्वला भोसले, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतिपदी दीपक वाघ,स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतिपदी प्रवीण निकुंभे, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी संगीता भावसार व उपसभापतिपदी उषा पवार यांची विनविरोध निवड झाली.

येथील नगरपंचायतीत दोन वर्षापूर्वी भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर विषय समिती सभापतीना सुरवातीला दोन वर्षाचा कार्यकाळ देण्यात आला होता. या सभापतींनी मुदतीत त्यांच्या पदांचे राजीनामे दिल्यानंतर नूतन सभापती निवडप्रक्रिया पार पाडली, यात विरोधी गटाकडून कुठलेही अर्ज दाखल न झाल्याने निवडप्रक्रिया बिनविरोध झाली. नगराध्यक्षा जयश्री पवार,उपनगराध्यक्ष बापू गिते, नगरसेविका रेखा सोनवणे, जयश्री पगारिया,मनीषा देसले,नर्गिसवी पठाण,सोनल नागरे,कल्पना खैरनार, नगरसेवक गजेंद्र भोसले, सुमीत नागरे,राहुल भोसले आदी उपस्थित होते. निवडप्रक्रियेप्रसंगी पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी संजय बागडे उपस्थित होते,तर मुख्याधिकारी दीपक पाटील, कार्यालय अर्घाक्षक राजेश पाडवी,जुबेर शहा,अमोल पाठक,दीपक पाटील,विक्रम राठोड आदींनी त्यांना सहकार्य केले.

विषय समिती निवडप्रक्रियेसंगी भाजप जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, उपाध्यक्ष विजय भोसले,गजेंद्र भोसले,चंद्रजित पाटील,आदिवासी आघाडी प्रदेश चिटणीस हेमंत पवार, तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, महेंद्र देसले,विनोद पगारिया, स्वप्नील भावसार,आबा सोनवणे आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित सभापतीचे आमदार अमरिशभाई पटेल,आमदार जयकुमार रावल,खा.डॉ.हिना गावित,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, धुळे विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप आप्ग्रवाल,जिल्हा परिषद कृषी सभापती हर्षवर्धन दहिते यांच्यासह नेत्यांनी अभिनंदन करत समाधान व्यक्त केले.

Back to top button