Jalgaon Crime News | सहा वर्षापासून फरार आरोपी अखेर गजाआड | पुढारी

Jalgaon Crime News | सहा वर्षापासून फरार आरोपी अखेर गजाआड

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
घरफोडी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील सहा वर्षापासून फरार असलेला आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने एक लाख 48 हजार रुपयांच्या मुद्देमालासह चोपडा शहरातून अटक करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुका , धरणगाव, अमळनेर, चोपडा शहर आणि शिरपूर पोलीस ठाण्यात वेगवेगळे ७ गुन्हे दाखल असलेला व. चोपडा शहर पोलीस ठाण्यामध्ये 2017 मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी सुरेश राजाराम बारेला (वय-२५ रा. देवळी ता. वरला, जि,बडवानी मध्य प्रदेश ह.मु. सुंदरगढी चोपडा) हा सहा वर्षांपासून फरार होता. फरार आरोपी चोपडा शरद महात्मा गांधी रोड या परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे दि. 27 फेब्रुवारी दुपारी तीन वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांनी आरोपी सुरेश बारेला याला चोरीच्या दुचाकीसह अटक केली. वेगवेगळे ७ गुन्ह्यांची आरोपीने कबुली देऊन चोरीतील मुद्देमाल आणि ३ चोरीच्या दुचाकी असा एकुण एकूण १ लाख ४८ हजार ३७० रुपयांचा मुद्देमान आरोपीकडून हस्तगत करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात आरोपीस देण्यात आले आहे.

हेही वाचा:

Back to top button