नाशिक पुणे रोडवरील मसाज पार्लरवर कारवाई, चार पीडित महिलांची सुटका | पुढारी

नाशिक पुणे रोडवरील मसाज पार्लरवर कारवाई, चार पीडित महिलांची सुटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक पुणे रोडवरील ‘विवा स्पा’ या मसाज पार्लरवर शहर पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणी मसाज पार्लरच्या बहाण्याने वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करीत येथून चार पीडित महिलांची सुटका केली.

नाशिकरोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सचीन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या पथकाने स्टार झोन मॉलमधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या विवा स्पा येथे कारवाई केली. या ठिकाणाहून चार महिलांची पोलिसांनी सुटका केली. तसेच स्पा सेंटरचा व्यवस्थापक अंकीत उर्फ गोलु साहु (२४), मदतनीस रुपेश बरार व मालक मयुर देव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील अंकीत व रुपेश या दोघांना अटक केली आहे. तिघा संशयितांनी संगनमत करून महिलांना वेश्यागमनास प्रवृत्त करीत त्यांच्या कमाईतील मिळकतीवर अवलंबून राहिल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे निरीक्षक बाबासाहेब दुकळे, सहायक निरीक्षक सचीन चौधरी, उपनिरीक्षक उंडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा :

Back to top button