धुळे : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी केली मशरुम शेती | पुढारी

धुळे : 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी केली मशरुम शेती

पिंपळनेर, जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा
येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कालावधीत शिक्षणाासोबतच व्यावहारिक ज्ञानासाठी व स्वयंस्फूर्तीने आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी स्वतः परीश्रम घेत मशरुमची शेती तयार केली  असल्याने त्यांचे सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. (Mukhyamantri Majhi Shala Sundar Shala)

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ (Mukhyamantri Majhi Shala Sundar Shala) या उपक्रमांतर्गत इंदिरा गांधी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळनेर येथे कौशल्य विकास व परसबाग कार्यक्रमाच्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विज्ञान शिक्षक प्रा. जे. ए. गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मशरुम शेती तयार केली. या उपक्रमात शिक्षक महेश मराठे तसेच मुख्याध्यापिका एस. एस. पवार यांचे मार्गदर्शन लाभले. सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या मशरुमला आजच्या बाजारपेठेत 300 ते 500 रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे.

या उपक्रमाच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना स्वतःच्या घरी कमीत कमी जागेत व कमीत कमी खर्चात मशरुम शेती कशी करता येईल व आपल्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हातभार लावू शकतील याबाबत प्रशिक्षण मिळाले. तसेच कलमी रोपे तयार करून स्वतःची परसबाग  देखील आपण तयार करू शकतो व स्वयंरोजगार मिळून उद्योजक बनण्याचे स्वप्न बाळगू  शकतो. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना स्वयं आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे अशी अपेक्षा प्राचार्य एस. एस. पवार यांनी व्यक्त केली. केंद्रप्रमुख एल. एम. पाटील, एस. एन. चव्हाण, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेंद्र मराठे यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षक गांगुर्डे यांचे कौतुक केले. तसेच संचालक जयेश मराठे, कुणाल गांगुर्डे, यजुवेंद्र गांगुर्डे, प्राचार्य एस. एस. पवार, बी. एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ. सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात हा उपक्रम यशस्वी  झाला.

दीपस्तंभ ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी माजी प्राचार्य एस. टी. सोनवणे, पद्माकर गुरव, आर. एल. पाटील, पांडुरंग घरटे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पर्यवेक्षक डी. पी. कुवर, जे. एन. मराठे, के. एस. गांगुर्डे, महेश मराठे, पी. आर. खैरनार, ए. आर. सूर्यवंशी, आर. व्ही. जगताप, एस. एस. मोहिते, एस. बी. बहिरम, सी. एम. बाविस्कर, डी. बी. खैरनार, व्ही. के. सूर्यवंशी, पी. एम. जाधव, एन. जी. गावित, एम. एस. मराठे, एस. एस. शेवाळे, के. आर. जैन, नलिनी पाटील प्रयोगशाळा परिचय जे. डी. मराठे, वाय. आर. मालपुरे, जी. बी. देवरे, सागर देशमुख व एल. पी. सावंत यांनी सहकार्य केले. (Mukhyamantri Majhi Shala Sundar Shala)

हेही वाचा:

Back to top button