जळगाव : भर बाजारपेठेत दुकानातून साडेचौदा लाखांचा ऐवज चोरीला  | पुढारी

जळगाव : भर बाजारपेठेत दुकानातून साडेचौदा लाखांचा ऐवज चोरीला 

जळगाव : शहरातील मारुती पेठ येथे असलेल्या सिताराम प्लाझा मध्ये तिसऱ्या व दुसऱ्या मजल्यावर सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये केलेल्या घरफोडीमध्ये 14 लाख 59 हजार 524 रुपयांच्या सोन्याचे रॉ मटेरियल घेऊन व दागिने घेऊन चोरटे पसार झाले. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यामध्ये चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. पोलीस प्रशासन अपयशी ठरताना दिसून येत आहे. स्थानिक पोलीस असो या एलसीबी असो या सर्वांना अज्ञात चोरट्यांनी एक प्रकारे आव्हानच दिले आहे. शहरातील मारुती पेठ सिताराम प्लाझा मध्ये तिसऱ्या मजल्यावर श्री अलंकार हे दागिने बनवण्याचे दुकान असून दुसऱ्या मजल्यावर नूर पॉलिश शिलाई सेंटर नावाचे सोन्याचे दागिने पॉलिश करण्याचे दुकान आहे. या दुकानांतून दि. 24 च्या रात्री 9 ते दि. 26 च्या सकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी गेट व लोखंडी चॅनल गेटचे कुलूप कापून आत शिरुन दुकानातील काउंटर व टेबल ड्रायव्हर मध्ये ठेवलेले सोन्याचे रॉ मटेरियल व दागिने असे २५९.७८० ग्रॅम असे 14 लाख 59 हजार 524 रुपयाचे ऐवज घेऊन अज्ञात चोरटे पसार झाले. याप्रकरणी सचिन प्रभाकर सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर हे करीत आहे.

हेही वाचा

 

Back to top button