अभिनेत्री अपूर्वा परांजपे ‘काव्यांजली’ मालिकेत! सानिका काशीकरने मालिका सोडली | पुढारी

अभिनेत्री अपूर्वा परांजपे 'काव्यांजली' मालिकेत! सानिका काशीकरने मालिका सोडली

पुढारी ऑनलाईन डेस्क : कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका काव्यांजली- सखी सावली या मालिकेत काव्या आणि अंजली या दोघी बहिणींच्या जोडीला तसेच प्रितम-अंजली या जोडप्याला ही प्रेक्षकांची पसंती मिळतेय. मालिकेतील श्रेष्ठा व निकिता यांची कायमच विश्वजीत आणि प्रितमला काव्या व अंजलीपासून दूर करण्याचे कारस्थान चालू असतं. या मालिकेत श्रेष्ठाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सानिका काशीकरने मालिकेतून एक्झिट घेतली आहे.

संबंधित बातम्या –

सानिका काशीकरने मालिका सोडली असून आता अभिनेत्री अपूर्वा परांजपे या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. श्रेष्ठाची नकारात्मक भूमिका असली तरी प्रेक्षकांना तितकीच पसंतीची आहे. काव्यांजलीमध्ये नवीन श्रेष्ठाची एंट्री पाहण्यासाठी काव्यांजली-सखी सावली, सोम-शनि, ८.३० वाजता पाहता येणार आहे.

Back to top button