Dhule Accident : गंगापूर गावाजवळ भरधाव ट्रालाची एसटी बसला धडक, प्रवासी जखमी | पुढारी

Dhule Accident : गंगापूर गावाजवळ भरधाव ट्रालाची एसटी बसला धडक, प्रवासी जखमी

पिंपळनेर : (जि.धुळे); पुढारी वृत्तसेवा– साक्री तालुक्यातील गंगापुर गावाजवळील कृष्णा पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगातील ट्रालाने बसला जोरदार धडक दिली. या अपघातात एसटी बसच्या कॅबिनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर बसमधील एक प्रवासी जखमी झाला.

बसचालक किशोर राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास ते वाहक कन्हैय्यालाल चौरे यांच्यासह (एम.एच.20/बी.एल.3423) क्रमांकाची बस घेवून धुळे बसस्थानकातून प्रवासी घेवून वापीच्या दिशेने निघाले.

राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वरील कुसुंबा-नेर मार्गे साक्रीकडे जात असताना गंगापुर गावाच्या पुढे कृष्णा पेट्रोलियम जवळ (जी.जे.10/टीएक्स 9228) क्रमांकाच्या ट्रालाने भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ट्राला चालकाने कुठलेही सिग्नल दिले नाही. तरीदेखील अपघात टाळण्यासाठी बस डिव्हायडरजवळ नेली असता ट्राला चालकाने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात बसच्या कॅबिनसह बाजुचा पत्रा पुर्णपणे निघाला व मुजम्मील हुसेन शेख हा प्रवासी जखमी झाला.

हेही वाचा :

Back to top button