नितीश कुमार पुन्‍हा ‘जेडीयू’चे अध्‍यक्ष होणार? लल्लन सिंह यांची उचलबांगडी होण्‍याची शक्‍यता | पुढारी

नितीश कुमार पुन्‍हा 'जेडीयू'चे अध्‍यक्ष होणार? लल्लन सिंह यांची उचलबांगडी होण्‍याची शक्‍यता

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिहारचे मुख्‍यमंत्री  नितीश कुमार ( Nitish Kumar ) पुन्‍हा एकदा जनता दल संयुक्‍त (जेडीयू) अध्‍यक्षपद स्‍वीकारण्‍याच्‍या तयारीत आहेत. शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी पक्षाच्‍या राष्‍ट्रीय कार्यकारिणीच्‍या बैठकीत विद्यमान अध्‍यक्ष लल्लन सिंह
(JDU chief Lalan Singh) यांची उचलबांगडी होण्‍याची शक्‍यता असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.

लल्लन सिंहांची ‘राजद’शी जवळीक वाढली

पक्षातील निकटवर्तींनी दिलेल्‍या सल्‍ल्‍यानुसार, नितीश कुमार पुन्‍हा एकदा पक्षाध्‍यक्षपद स्‍वत:कडे घेण्‍याची शक्‍यता आहे. नितीश कुमार लल्लन सिंह यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. मागील काही दिवस लल्लन सिंह हे राष्‍ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशी त्यांची वाढती जवळीक हेही यामागील कारण मानले जात आहे.

लल्लन सिंह 2024 ची लोकसभा निवडणूक मुंगेरमधून पुन्हा लढण्यास उत्सुक आहेत. ते राजदकडून निवडणूक लढवू शकतात. तसेच इंडिया आघाडीतील मित्र पक्षांबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्‍यासाठी नितीश कुमार पक्षाची सूत्रे आपल्‍याकडे घेतील, असे मानले जात आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button