Dhule Pimpalner : मातोश्री सेवाभावी संस्थेच्या रक्तदान शिबिरात 51 दात्यांचे रक्तदान | पुढारी

Dhule Pimpalner : मातोश्री सेवाभावी संस्थेच्या रक्तदान शिबिरात 51 दात्यांचे रक्तदान

पिंपळनेर(जि.धुळे); पुढारी वृत्तसेवा; पिंपळनेर तालुक्यातील निजामपूर-जैताणे येथील मातोश्री सेवाभावी संस्थेच्या वतीने साक्री ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात 51 दात्यांचे रक्तदान झाले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबीर घेण्यात आले.

क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने शिबिराचे उद्घाटन झाले. साक्री ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिक्षिका डॉ.वैशाली शिरसाठ, संस्थेचे अध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते त्रिलोक दवे, युवा कार्यकर्ते भय्या गुरव, जैताणेचे माजी उपसरपंच नवल खैरनार, मुख्याध्यापक कमलेश भामरे, डॉ.भटनागर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले. सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या शिबिरात दुपारी 3 वाजेपर्यंत 51 दात्यांचे रक्तदान झाले. दात्यांना मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे टी-शर्ट, सन्मानपत्रे व अल्पोपहार देण्यात आला. तर जिल्हा रुग्णालयातर्फेही प्रमाणपत्रे व रक्तदान कार्ड देण्यात आले.

रक्तदान शिबिराला राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी भेटी देऊन मातोश्री सेवाभावी संस्थेच्या या सेवाभावी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष राजनारायण जगदाळे, सचिव सुशीलकुमार जगदाळे, खजिनदार जगदीश खैरनार, संचालक भारत जाधव, आशुतोष जगदाळे व अनुराग जगदाळे आदींनी परिश्रम घेतले. तसेच अखिल भारतीय माळी महासंघाचे जैताणे शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उपाध्यक्ष रवींद्र देवरे, सचिव श्रीकांत खलाणे, खजिनदार सागर जगदाळे, कायदेशीर सल्लागार ऍड.विकास माळी, तुषार देवरे, नंदकुमार जाधव, अशोक पिंपळे, चेतन गवळे, छोटू जाधव आदींनी विशेष सहकार्य केले.

साक्री ग्रामीण रुग्णालय, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रक्तसंकलन केंद्र, धुळे येथील रक्तसंक्रमण अधिकारी महेश जोशी, जनसंपर्क अधिकारी चंदूलाल साठे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुनील शिंदे, योगिता कोकणी, हेमंत देवरे, प्रयोगशाळा परिचर सिद्धार्थ भामरे, रुग्णवाहिका चालक दीपक कासार आदींनी रक्तसंकलनासाठी सहकार्य केले.

केवळ गटातटाचे व जातीपातीचे संकुचित राजकारण करण्यापेक्षा समाजहितासाठी विधायक उपक्रम राबवून समाजकारण करण्याचा संस्थेचा प्रामाणिक उद्देश असल्याची भूमिका प्रा.भगवान जगदाळे यांनी यावेळी बोलताना मांडली. संस्थेचे सचिव सुशीलकुमार जगदाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हेही वाचा :

Back to top button