Pune Leopard News : देवजाळीत उसाच्या शेतात आढळले तीन बछडे | पुढारी

Pune Leopard News : देवजाळीत उसाच्या शेतात आढळले तीन बछडे

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील देवजाळी येथे ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. ते एक ते दीड महिन्याचे असून, त्यांना नैसर्गिक अधिवासात मादीच्या ताब्यात देण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव ऊस तोडणी थांबवण्यात आली आहे. देवजाळी येथील पवन थोरात यांच्या उसाची तोडणी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आहॆ.

ऊस तोडणी सुरु असताना तीन बछडे उसाच्या सरीमध्ये ऊस तोडणी मजुरांना दिसले. मजुरांनी ही माहिती ऊस मालकाला सांगितल्यावर त्यांनी तात्काळ वन विभागाला ही माहिती कळवली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी आल्यावर त्यांनी ऊस तोडणी थांबवली.

वनपाल अनिता होले, वन कर्मचारी खंडू भुजबळ, ग्रामसुरक्षा दल जवान आदित्य डेरे, शंतनू डेरे आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ऊस तोडणी मजुरांना दुसऱ्या प्लॉटमध्ये जाण्यास सांगितले. दरम्यान उसाच्या शेतामध्ये सापडलेली बछड्याची पिल्लं रात्री उसाच्या शेतातच ठेवल्याने बिबट्याच्या मादीने तीनही पिल्ले घेऊन गेली आहे अशी माहिती अशी माहिती वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा 

Back to top button