जळगाव : जिल्ह्यात फक्त एकाच तालुक्यात दुष्काळ आहे का? उबाठा जिल्हाप्रमुख हर्षल माने यांचा सवाल | पुढारी

जळगाव : जिल्ह्यात फक्त एकाच तालुक्यात दुष्काळ आहे का? उबाठा जिल्हाप्रमुख हर्षल माने यांचा सवाल

जळगाव : राज्य सरकारने दुष्काळी तालुके जाहीर केले आहेत. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दुष्काळ जन्य परिस्थिती आहे. मात्र, असे असताना चाळीसगाव तालुका हाच केवळ दुष्काळ ग्रस्त तालुका जाहीर करण्यात आला. फक्त खासदारांचा तालुका दुष्काळी आहे का? मग बाकी तालुक्यात दुष्काळ नाही का ? असा सवाल उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल माने यांनी उपस्थित केला आहे.

चाळीसगावसह भडगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा हा देखील दुष्काळी पट्टा आहे, यांनाही दुष्काळ तालुक्यांत सामाविष्ट करण्यात यावे अन्यथा  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल व उपोषण देखील करण्याचा इशारा यावेळी पत्रकारांशी बोलताना माने यांनी दिला.

राज्य शासनाने दुष्काळी तालुके जाहीर करून काही बाबींना सवलत जाहीर केली आहे. यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल माने यांनी जळगाव पद्मालय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी फक्त चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झालेला आहे. इतर तालुक्यांमध्ये दुष्काळ नाही का? असा प्रश्न उपस्थित कर इतर तालुकेही दुष्काळ ग्रस्त जाहीर करावे जर ते जाहीर झाले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी यावेळी दिला. शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले की, आमदारांनी वर्षातून एकदा आमसभा घेणे गरजेचे असते. मात्र आ. चिमणराव पाटील यांनी गेल्या चार वर्षात पारोळा-एरंडोल मतदारसंघात एकदाही आमसभा घेतलेली नाही.  त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वेळ मिळणार कधी असा सवाल हर्षल माने यांनी केला.

तसेच, सत्ताधारी आमदार, खासदारांना सामान्य शेतकऱ्यांशी घेणे देणे नाही. त्यांना टक्केवारीतच स्वारस्य आहे. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ परिस्थिती असताना केवळ चाळीसगाव दुष्काळी जाहीर करणे हे पक्षपातीपणा दिसून येत आहे, असेही हर्षल माने म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button