नाशिक क्राईम : विधिसंघर्षित चौघे बालक निघाले अट्टल दुचाकीचोर | पुढारी

नाशिक क्राईम : विधिसंघर्षित चौघे बालक निघाले अट्टल दुचाकीचोर

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

आडगाव गुन्हे शोध पथकाने चौघा विधिसंघर्षित बालकांच्या टोळीला पकडत त्यांच्या ताब्यातील चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

आडगाव गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत असताना चार संशयित चोर दोन दुचाकींच्या विक्रीसाठी मेडिकल कॉलेज चौफुलीवर येणार असल्याचे समजले होते. या चारही संशयितांना सापळा रचून पथकाने ताब्यात घेत अधिक चौकशी केले असता ते विधिसंघर्षित बालक असल्याचे समजले. या चौघांना विश्वासात घेऊन या बालकांची चौकशी केली असता त्यांनी पंचवटीतून दोन, आडगावमधून दोन, तर उपनगरमधून एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. दुचाकी चोरीत एकूण सहा विधिसंघर्षित बालकांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. अन्य दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक सुभाष जाधव, भूषण देवरे आणि आ़डगाव गुन्हे शोध पथकाने केली.

हेही वाचा :

Back to top button