Nashik : कळवण तालुक्यात काही गावात पूरस्थिती, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा | पुढारी

Nashik : कळवण तालुक्यात काही गावात पूरस्थिती, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकच्या कळवण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार असल्यामुळे धरणक्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे काही गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

तालुक्यात लहान मोठे 17 लघु प्रकल्प १०० टक्के फुल झाले आहे. गिरणा नदी पात्रात चनकापूर, पुंनद लहान मोठ्या धरणातून पूर पाणी हे गिरणा नदी पात्रात येत असल्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. एकूण 10 हजार पेक्षा जास्त क्यूसेस पाणी गिरणा पात्रात येत आहे.

पूर पाण्यामुळे बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे. मात्र कळवण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणांमधील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. चणकापूर धरणामध्ये १०० टक्के पाणी भरले असून चणकापूर व पूणद धरणासाठी गेल्या २ दिवसांपासून पाऊस वरदान ठरला आहे.  जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या चणकापूर धरणात उपयुक्त पाणी साठ्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे.

हेही वाचा :

Back to top button