Nashik : कळवण तालुक्यात पावसाची संततधार  | पुढारी

Nashik : कळवण तालुक्यात पावसाची संततधार 

कळवण : एक महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपासून कळवण तालुक्यात जोरदार हजेरी लावली. दिवसभर रिमझिम व हलक्या सरी सुरू होत्या. यामुळे शेतकरी व व्यापारीवर्गात समाधानाचे वातावरण आहे.

तर दुसरीकडे, शाळकरी मुलांचे मोठे हाल होत आहेत. दिवसभर कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसाने मात्र अनेकांची धावपळ झाली तर अनेकांना घरात बसून पाऊस पाहावा लागला. तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील चणकापूर, पुनद असे लहान मोठे २० धरणे आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यामध्ये वाढ होत आहे. तालुक्यात भात, मका, नागली, सोयाबीन ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. पाऊस उशिरा दाखल झाल्याने मका, भात पीक यंदा उशिरा लागवड होणार आहे. त्यामुळे भात पिकाच्या उत्पन्नात घट होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा :

Back to top button