सप्तशृंगी देवी मंदिरात तुर्तास ड्रेसकोड नाही; विश्वस्त, ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय | पुढारी

सप्तशृंगी देवी मंदिरात तुर्तास ड्रेसकोड नाही; विश्वस्त, ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावरील आदिमायेच्या मंदिरातील पावित्र्य जपण्यासाठी भाविकांना ड्रेस कोड लागू व्हावा याबाबत गुरुवारी (दि.१५) झालेल्या विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांच्या बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. राज्यातील इतर मंदिरात जेव्हा ड्रेसकोडबाबतचा निर्णय घेतला जाईल, तेव्हा सप्तश्रृंगी मंदिरातील याबाबतचा नियम लागू करण्याबाबतचा विचार केला जाणार असल्याचा एकप्रकारचा ठरावच बैठकीदरम्यान घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून विविध मंदिरांमध्ये ड्रेसकोडबाबतचा निर्णय गाजत आहे. कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात प्रवेशासाठी ड्रेसकोड बंधनकारक करण्यात आल्यानंतर इतर देवस्थानमध्येही अशाप्रकारचा ड्रेसकोड बंधनकारक करण्यावर विचारविमर्श केला जात आहे. सप्तश्रृंगी देवस्थान ट्रेस्ट आणि वणी ग्रामस्थांमध्ये देखील या निर्णयावर यापूर्वी चर्चा केली गेली. दरम्यान, गुरुवारच्या बैठकीत याविषयी निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती, परंतु राज्यातील इतर मंदिरांमध्ये अशाप्रकारचा ड्रेसकोड लागू केल्यानंतरच सप्तश्रृंगी देवस्थान याबाबत निर्णय विचाराधीन ठेवेल असा एकप्रकारचा ठरावच यावेळी मांडण्यात आला. बैठकीसाठी देवस्थान विश्वस्त मंडळातील सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. बैठकीतील निर्णयाकडे संबंध महाराष्ट्राचे लक्ष लागून होते.

हेही वाचा : 

Back to top button