Nashik : महामार्गावर बर्निंग कारचा थरार, नाशिककडून धुळ्याकडे जाणाऱ्या इको स्पोर्टने घेतला पेट | पुढारी

Nashik : महामार्गावर बर्निंग कारचा थरार, नाशिककडून धुळ्याकडे जाणाऱ्या इको स्पोर्टने घेतला पेट

 नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा

मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे वणीजवळ गुरुवारी (दि.११) दुपारी ‘बर्निंग कार’चा थरार अनुभवायास मिळाला. नाशिककडून धुळ्याकडे जाणाऱ्या या बर्निंग कारमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून कार मात्र खाक झाली.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी इको स्पोर्ट कार (क्रमांक एमएच १८, एजे ४८९८) मधून चालक अनिकेत प्रदीप कापडणीस व त्यांचे मित्र हे नाशिककडून धुळ्याकडे जात होते. पिंपळगाव बसवंत शहरातील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिरवाडे वणी परिसरातील हॉटेल दौलतसमोर कारने अचानक पेट घेतला. यामुळे चालकाने कार तात्काळ रस्त्याच्या कडेला उभी करून बाहेर पडल्याने ते बचावले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोकराव पवार व पिंपळगाव अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. बघ्यांच्या गर्दीमुळे काही वेळ वाहतूकही खोळंबली होती. त्यामुळे पोलिसांना व अग्निशमन यंत्रणेला मदत कार्याला अडचण निर्माण झाली होती. घटनेची पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात नोंद झाली. 

हेही वाचा :

Back to top button